१९७२ नंतरच्या भीषण दुष्काळात शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा!

प्रतिनिधी / प्रतापगडचे वारेवर्धा : महाराष्ट्रात १९७२ नंतरची सर्वात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना राज्य सरकारकडून दिवाळीच्या निमित्ताने शेतकऱ्यांना देण्यात आलेली ५ हजार रुपयांची मदत अत्यंत तुटपुंजी असून, ही मदत म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखी आहे, अशा शब्दांत खासदार अमर काळे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी शासनाने केवळ आश्वাসে न देता प्रत्यक्ष कृती करावी, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील अंबाडा येथे शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते बंडुभाऊ साकत यांच्या नेतृखाली सुरू असलेल्या ‘आकंठ दफन आंदोलनस्थळी’ खासदार अमर काळे यांनी भेट देऊन आंदोलकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा, अडचणी आणि मागण्या जाणून घेत शासनदरबारी या प्रश्नांचा पाठपुरावा करून योग्य तोडगा काढण्याची ग्वाही दिली. सध्याची दुष्काळी परिस्थिती अत्यंत गंभीर असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत केवळ ५ हजार रुपयांची मदत देऊन सरकार आपली जबाबदारी झटकू शकत नाही. शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीच्या तुलनेत योग्य आणि सन्मानजनक आर्थिक मदत मिळणे आवश्यक आहे. शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असताना त्यालाच आपल्या हक्कांसाठी वारंवार आंदोलन करावे लागत असेल, तर हे शासनाच्या कार्यपद्धतीवरील गंभीर बाब असल्याचे खासदार काळे यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केवळ घोषणा, आश्वাসে आणि वेळकाढूपणा करून चालणार नाही. शासनाने संवेदनशीलता दाखवून त्यांच्या मागण्यांवर कालबद्ध आणि ठोस निर्णय घ्यावेत, शेतकऱ्यांचा आवाज दडपता येणार नाही आणि आश्वसनांनी त्यांची वेदना संपणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. शासनस्तरावर चर्चा घडवून आणून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण ठामपणे पाठपुरावा करू, असे आश्वासन त्यांनी आंदोलनांना दिले. त्यांच्या या स्वाधीनंतर आंदोलकांनी तूर्तास आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. याचबरोबर स्थानिक पातळीवरील प्रश्नांवर बोलताना खासदार काळे यांनी पाणीपुरवठ्याच्या समस्येसला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले. आगामी दोन ते तीन दिवसांत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावून पाणीपुरवठ्याचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरही त्यांनी सरकारला धारेवर धरले. स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक भार पडण्याची शक्यता आणि जनतेच्या मनातील प्रश्न लक्षात घेता या विषयावर सखोल विचार होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. जनतेच्या हिताला बाधा पोहोचवणाऱ्या निर्णयांना विरोध करून नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण भूमिका घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शेतकरी प्रश्न, अपुरी दुष्काळी मदत, स्मार्ट मीटर आणि जनतेच्या विविध ज्वलंत समस्यांवर महाविकास आघाडी तसेच पक्षाच्या माध्यमातून आगामी काळात संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही खासदार काळे यांनी दिला. शेतकऱ्यांचा प्रश्न हा राजकारणाचा विषय नसून त्यांच्या जगण्या-मरणाचा प्रश्न आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *