प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे:वर्धा : शनिवार, दिनांक २८ मार्च २०२६ महाराष्ट्र राज्य कलाध्यापक महामंडळ व सातारा जिल्हा कलाध्यापक संघ, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ४४ वी राज्यस्तरीय कलाशिक्षण परिषद मोठ्या उत्साहात स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह, जिल्हा परिषद, सातारा येथे संपन्न झाली.
या परिषदेत राज्यातील विविध भागांतील सुमारे ८०० हून अधिक कलाशिक्षकांनी सहभाग नोंदवला. वर्धा जिल्ह्यातील सुमारे २६ कलाशिक्षकांनीही उत्साहाने सहभाग घेतला. दोन दिवसीय परिषदेमध्ये कलाशिक्षण क्षेत्रातील नवनवीन संकल्पना, अध्यापनातील नाविन्य, तसेच शिल्पकला, चित्रकला, नृत्यनाट्य, गायन-वादन, हस्तकला व चित्रप्रदर्शन या विविध कला प्रकारांवर सखोल चर्चा व प्रात्यक्षिक सत्रांचे आयोजन करण्यात आले.
परिषदेच्या उद्घाटन समारंभाला अध्यक्ष म्हणून नरेंद्रजी बारई अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ, तसेच कार्याध्यक्ष म्हणून किशोर इंगळे कलासंचालक, चंद्रकांत दळवी चेअरमन, रयत शिक्षण संस्था, सातारा तसेच सातारा कलाध्यापक संघाचे अध्यक्ष उमेश देशमुख, सचिव विलास शेवाळे उपस्थित होते. याशिवाय कौस्तुभ गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, पी. आर. पाटील, हिरामण पाटील मुंबई, बलराज सामंत, अश्विनी कदम तसेच अन्य मान्यवरांची सन्माननीय उपस्थिती लाभली. या प्रसंगी राज्यस्तरीय आदर्श कलाध्यापक पुरस्कार देऊन सुषमा सुनील बाळसराफ, यशवंत विद्यालय, वायगांव कला, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय व उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच कलाध्यापक संघाचे अध्यक्ष, आशिष पोहाणे, गोवर्धन इंगळकर, धनंजय नाखले, सुभाष राठोड, यांनी शुभेच्छा दिल्या. या परिषदेमुळे कलाशिक्षण क्षेत्रात नवीन विचारांची देवाण-घेवाण होऊन अध्यापनात अधिक सुसंगती व गुणवत्ता वाढण्यास मोठी मदत होणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
तसेच मुख्याध्यापक श्री. चंद्रकांत ठाकरे, शिक्षिका भारती कार्वेकर, रेखा आत्राम, स्मिता इंगळे, अर्चना धानोरकर, वैशाली फरताडे, वनिता देशमुख, वैशाली राऊत, ज्योती पवार, ज्योत्स्ना लांबट, प्रेमलता कोहळे, अपर्णा ढवळे, वैशाली श्रीरामे, रुपाली तडस, स्वाती अवचट, गजानन वसू, मनोज रामटेके, जनार्दन मते, निसरड, नीलेश तायवाडे, मंगेश भोंमले, दिनेश भगत, शैलेन्द्र निकोसे, रोठे, भोगाडे, जरिले, सातोकर, मेंढे, मीना कुणाल ग्रंथपाल व शिक्षकेतर कर्मचारीवृंद तसेच कलाशिक्षक विपिन मगरे, मनोज बाचले, उत्तम वानखेडे, प्रमोद वाघ, संजय चाफले, प्रशांत बोरकर, रवी मुटे, नलिनी नाखले, रंजना राठोड, संजीवनी पोहाणे, ज्योत्स्ना मगरे, मनीषा मुळे, राजीव बन्सी यांनी अभिनंदन केले.