खर्च करूनही माहिती उपलब्ध नसल्याचा कांगावा, कृषि विभागाला कोणाचे अभय? चर्चेला उधाण
वर्धा : जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषि विभागाच्यावतीने अनेक योजना राबवल्या जातात. परंतु अधिकारी व राजकीय अभय यामुळे या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना न मिलता इतरांनाच मिळत आहे. सेवाग्राम चरखा गृहात जिल्हा कृषि अधीक्षक (आत्मा) च्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी प्रशिक्षण दोन दिवसीय शिबिरात आल्याने जिल्ह्यातील शेतकरी संतप्त झाले आहेत. विशेष म्हणजे कृषि विभागाकडे या प्रशिक्षणासाठी आलेल्या संपूर्ण शेतकऱ्यांची माहिती उपलब्ध नसल्याची माहिती जिल्हा कृषि अधीक्षक उपरीकर यांनी दिल्याने चर्चेला उधाण आले आहे.
३ व ४ ऑक्टोबरला सेवाग्रामच्या चरखा गृहात कृषि विभागाच्यावतीने शेतकरी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. यात युवा शेतकरी ग्रुपलाही कृषि विभागाने सहभागी केले. राज्यस्तरीय असलेल्या या शिबिरात अनेक राज्यांतील तरुण, तरुणी सहभागी झाले.
यांच्याकडून चक्क ६ हजार रुपये नोंदणी फी वसूल करण्यात आली. तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ५० रुपये फी ठेवण्यात आली होती. परंतु अधिकाऱ्यांच्या लापरवाहिने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या प्रशिक्षण शिबिरात प्रवेश नाकारण्यात आल्याने काही काळ चरखागृहात तारांबळ उडाली. शेतकऱ्यांनी फेर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे यांना फोन करून आपबिती सांगितली. सुनील कोल्हे हे त्वरित चरखागृहात पोहचून काही काळ हंगामा केला. त्यानंतर वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रवेश देण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार युवा शेतकरी ग्रुपच्या वतीने यांनी तयार केलेल्या वेबसाईटवर विविध राज्यातील सुमारे तरुणांनी ६ हजार रुपये भरून शिबिरात प्रवेश घेतला. परंतु याबाबत कृषि विभाग कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत असल्याने यात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची चर्चेला जिल्ह्यात उधान आले आहे. विशेष म्हणजे चरखा गृह हॉल बुकिंग जेवणाची व्यवस्था कृषि विभागाने केल्याने ६ हजार रुपये नोंदणी फी गेली कुठे, असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकरी विचारीत आहे.