प्रतिनिधी/ दै. प्रतापगडचे वारे
समुद्रपूर : कृषी उत्पन्न बाजार समिती, समुद्रपूर अंतर्गत खापरी (धोंडगाव) येथील एम. जे. आर. ॲग्रोटेक येथे सन २०२६-२७ चा कापूस खरेदी शुभारंभ धनत्रयोदशीच्या दिवशी शुक्रवारी ६ नोव्हेंबर ला दुपारी १ २ वाजता बाजार समितीचे सभापती हिम्मतराव चतुर आणि जिनींगचे सर्वेसर्वा पुखराजजी रांका, कुमुदकिशोरजी रांका, नरेशकुमारजी रांका, कमलकिशोरजी रांका, श्रेणिक पुखराजजी रांका, पियुष कुमुदकिशोरजी रांका, लक्ष नरेशकुमारजी रांका, आनंद कमलकिशोरजी रांका यांच्या हस्ते होणार आहे. या वर्षाच्या कोरड्या दुष्काळामुळे कापूस उत्पादनात खूप घट होण्याची शक्यता आहे यामुळे
शेतकऱ्यांनी आपला कापूस परवाना धारक कापूस खरेदी केंद्रावरच विकावा जेणेकरून योग्य भाव मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तालुक्यातील व परिसरातील शेतकऱ्यांनी आपला नवीन कापूस शुभारंभाच्या दिवशी विक्री करिता आणावा असे आवाहन उपाध्यक्ष वामनराव चंदनखेडे, संचालक शांतीलाल गांधी, महादेव बादले, अशोक वांदिले, महेश झोटिंग, जनार्धन हुलके, , हेमंत पाहुणे, उल्हास कोटमकर, मनीष निखाडे, गोपाळवंगल, गुरुदेव चौधरी, अरुण बकाल, देविदास डोडके, अमर झाडे, गणेश बैरागडे, पुष्पाताई कुबडे, शशिकला सुमटकर, कमलकिशोर रांका, आनंद रांका, पियुष रांका, श्रेणिक रांका, आणि बाजार समिती चे सचिव शंकर धोटे, यांनी केले आहे.