जनतेच्या मागणीला न्याय; खासदार अमरभाऊ काळे यांच्या पाठपुराव्याला यश!

चोपण येथे चार डेपो उभारणीसाठी १३ लाख ७१ हजार ९६२ रुपयांची तरतूद; निविदा प्रक्रिया प्रसिद्ध

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे

वर्धा : ग्रामीण भागातील शेतकरी आणि पशुपालकांच्या अडचणींची गांभीर्याने दखल घेत जनतेच्या मागण्यांना शासनदरबारी न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमरभाऊ काळे यांच्या पाठपुराव्याला आणखी एक महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. कारंजा (घाडगे) तालुक्यातील मौजे चोपण येथे चार डेपो उभारण्याच्या शासनाकडून तब्बल १३ लाख ७१ हजार ९६२ रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून, संबंधित कामाची निविदाही प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे चोपण परिसरातील पशुपालक आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

चोपण परिसरात चार डेपो उभारण्यात यावा, अशी ग्रामीण भागातील नागरिक आणि शेतकऱ्यांकडून सातत्याने मागणी होत होती. ग्रामीण भागातील पशुधनाचे संगोपन, चाऱ्याची उपलब्धता आणि पशुपालकांना भेडसावणाऱ्या अडचणी लक्षात घेता हा प्रश्न मार्गी लागणे अत्यंत आवश्यकच होते. त्याच अनुषंगाने स्थानिक नागरिकांनी खासदार अमरभाऊ काळे यांच्याकडे निवेदन सादर करून चार डेपो उभारणीसाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्याची मागणी केली होती.

नागरिकांनी मांडलेल्या या प्रश्नांची खासदार अमरभाऊ काळे यांनी केवळ निवेदनापुरती दखल न घेता त्याचा सातत्याने पाठपुरावा केला. संबंधित यंत्रणेकडे पाठपुरावा करून चोपण येथील चार डेपोचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.

शेतकरी आणि पशुपालक हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे घटक आहेत. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन करण्याच्या दृष्टीने चाऱ्याची उपलब्धता हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. अशा परिस्थितीत चोपण येथे चार डेपो उभारणीसाठी निधीची तरतूद होणे ही परिस्थितीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाब मानली जात आहे.

खासदार अमरभाऊ काळे यांनी स्थानिक नागरिकांच्या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन शासनस्तरावर केलेला पाठपुरावा या कामाच्या मंजुरीसाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे. लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत त्यांच्या मागण्यांना न्याय मिळवून देण्याच्या त्यांच्या भूमिकेचे या निर्णयातून पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.

दरम्यान, चोपण येथे चार डेपो उभारणीसाठी निधीची तरतूद करून निविदा प्रसिद्ध झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या कामासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या खासदार अमरभाऊ काळे यांच्या प्रयत्नांचे परिसरातून स्वागत होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *