आर्वी तालुक्यात मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई
वर्धा (जिमाका) : आर्वी तालुक्यातील मौजा निंबोली (शेंडे) परिसरत मत्स्यव्यवसाय विभागाने दोन दिवस विशेष मोहिम राबवून प्रतिबंधित ‘आफ्रिकन थाई माгур’ माशांच्या अवैध मत्स्यपालनावर मोठी कारवाई केली. या कारवाईत शेततळ्यांमधून सुमारे २ हजार ७०० किलो जिंवत माгур मासे जप्त करून त्यांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली.
मत्स्यव्यवसायचे प्रादेशिक उपआयुक्त सुनील जांभुळे यांच्या मार्गदर्शनाखाली मत्स्यव्यवसाय, महसूल व पोलिस विभागाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. ही मोहिम मत्स्यव्यवसायचे सहाय्यक आयुक्त स्वप्नील वालदे, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी राहुल जाधव, आर्वीचे पोलिस उपनिरीक्षक महेश राठोड, हवालदार मंगेश वाघाडे, चेतन बोरकर, नेरीचे तलाठी अमोल खंडारे, महसूल सेवक अमोल शेंडे, निंबोली (शेंडे) येथील उपसरपंच सुरेखा कदम यांच्या समक्ष पार पडली.
आफ्रिकन थाई मागुर हा मासा दूषित पाण्यात वाढणारा व निकृष्ट खाद्य खाणारा मासा आहे. या माशाच्या सेवनामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम संभवतात. मांसाहारी व आक्रमक प्रवृत्तीच्या या माशामुळे स्थानिक प्रजातींना व नैसर्गिक परिसंस्थाना मोठा धोका निर्माण होतो. या माशामुळे स्थानिक प्रामाणिक मत्स्यपालकांना योग्य बाजारपेठ आणि न्याय मिळण्यास अडचण निर्माण होते. पर्यावरण व मानवी आरोग्यास घातक असणाऱ्या थाई मागुरचे पालन किंवा विक्री प्रतिबंधत्मक आहे. त्यामुळे या माशाची पैदास किंवा विक्री करू नये आणि जिल्ह्यात इतर ठिकाणी कोणी थाई मागुरचे पालन किंवा विक्री करत असल्यास योग्य कार्यवाहीसाठी मत्स्यव्यवसाय कार्यालयास कळवावे, असे सहाय्यक आयुक्त स्वप्नील वालदे यांनी कळविले आहे.