ठाणेदार सेलू यांच्यावर आय जी कार्यालयाकडून चौकशी सुरू झाल्याने आपण समाधानी – मंगेश चोरे

सावांगी ठाणेदार श्री विनोद गिरी यांच्या मध्यस्थीने आत्मदहन मागे

प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे

वर्धा : सेलू ठाणेदार वाघोडे यांच्या भ्रष्टाचाराच्या बातम्या प्रकाशित केल्याने त्यांनी केलेल्या बेकायदेशीर प्रकाराची तक्रार पत्रकार मंगेश चोरे यांनी पोलीस महासंचालक साहेब मुंबई यांना दिली होती.

सादर तक्रारीवर कारवाई होत नसल्याचा संताप मनात ठेऊन येत्या ३१ तारखेला पोलीस अधीक्षक कार्यालयापुढे आत्मदहन करण्याचा निर्धार करण्यात आला होता. सदर प्रकरणात चोरे यांनी श्री.संदीप पाटील साहेब आय जी नागपूर यांची भेट घेऊन आत्मदहनाची नोटीस दिली होती. त्या अनुषंगाने सदर प्रकरणाला गांभीर्याने घेऊन ठाणेदार सेलू यांचेवर सखोल चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे आय जी कार्यालयाकडून प्राप्त झाले.

या अनुषंगाने आत्मदहन हा पर्याय नसून कायदेशीर प्रक्रियेतून मार्ग काढण्याचा उपदेश सावांगीचे अनुभवी पोलीस निरीक्षक श्री.विनोद गिरी यांनी दिल्याने आपण आपले हे आत्मदहन मागे घेत असून वर्धा पोलीस अधीक्षक यांनी निष्पक्ष चौकशी करावी अशी चोरे यांनी विनंती केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *