विभागीय युवक महोत्सव २०२५ मध्ये ‘लोकगीत समूह’ या स्पर्धेत यशवंत महाविद्यालयाचा प्रथम क्रमांक

महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत, जिल्हा क्रीडा परिषद भंडारा व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय भंडारा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विभागीय युवक महोत्सव २०२५ मध्ये ‘लोकगीत समूह’ या स्पर्धेत यशवंत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.

या लोकगीत स्पर्धेत महाविद्यालयाच्या रिता खोडे, सलोनी देवतळे, वैष्णवी शिवरकर, दिव्या किन्हेकर, अभिलाषा तरवटकर, अनुष्का भानसे, रोमित गलांडे, विवेक नरांगे, ओम चुटे, समीर गायन आणि अनुष्का चुटे या विद्यार्थ्यांनी गोंधळ -जागर या लोकगीत प्रकारचे पारंपारिक शैलीतील सादरीकरण, मधुर समन्वयाच्या बळावर त्यांनी प्रथम स्थान प्राप्त केले व अ हिल्यानगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय युवा महोत्सवासाठी संघाची निवड झाली आहे.

व या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.समीरभाऊ देशमुख, माजी आमदार व लोकनेते प्राध्यापक सुरेशभाऊ देशमुख, प्राचार्य डॉ. गिरीश ठाकरे, संगीत विभागप्रमुख प्रा. अरूणा हरले तसेच आई-वडील व आप्तजनांना दिले.

प्रा. प्रफुल्ल काळे, डॉ. निकिता निर्मळ, प्रा. ऋषिकांत मेसेकर, डॉ. रसिका करंडे यांना दिले. तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले. गणमान्य व्यक्तींकडून त्यांच्यावर अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *