खासदार अमर काळे यांची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना पत्र; शासकीय बांधकामावर निबंध टाका
प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे
वर्धा : अल्प पर्जन्यमानामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर सिंचनाच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पाणीपातळी खोल गेल्याने पिण्याच्या पाņasह शेतीसाठीही पाण्याची टंचाई जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सिंचनासाठी विहिरींचे व विंधन विहिरीचे खोलीकरण करण्याची विशेष बाब म्हणून परवानगी द्यावी अशी मागणी खासदार अमर काळे यांनी जिल्हाधिकारी, वर्धा यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. कारंजा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या निवेदनांदर्भ देत खासदार काळे यांनी सध्याच्या परिस्थितीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. पाणीपातळी खोल गेल्याने शेतकऱ्यांना सिंचनात अडचणी येत असून, कापूस व पिके जगविण्यासाठी पाण्याची नितांत गरज आहे. अशा परिस्थितीत जुन्या विहिरीचे व विंधन विहिरीचे खोलीकरण परवानगी मिळणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. कारंजा तालुका दुष्काळप्रवण क्षेत्र म्हणून परिचित असून, शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने वस्तुस्थितीची पाहणी करावी. अपवादात्मक परिस्थितीत शेतजमीन, फळबागा आणि पिके जगविण्यासाठी व शेतकर्यांचे शेतीचे नुकसान होऊ नये म्हणून आवश्यक असलेल्या विहिरींचे व विंधन विहिरीचे खोलीकरण करण्यास परवानगी देण्याबाबत सहानुभूतीपूर्वक निर्णय घ्यावा, अशी मागणीही खासदार अमर काळे यांनी केली आहे.
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने या मागणीचा गांभीर्याने विचार करून तातडीने सकारात्मक निर्णयघ्यावा, असे आवाहन खासदार काळे यांनी केले आहे. यासोबतच त्यांनी सिमेंट रस्ते सिमेंट नाल्या तसेच शासकीय इमारती गृहनिर्माण सोसायट्यांचे बांधकाम, नविन मोठ्या घरांचे बांधकामावर बंदी टाकण्याची मागणी केली आहे.