दोन अपघातामध्ये एक मृत ३ गंभीर

प्रतिनिधी/ दै. प्रतापगडचे वारे

समुद्रपूर : राष्ट्रीय महामार्ग ४४ वर आजदा पाटी जवळ रस्त्याचे काम सुरू असल्याने एकतर्फी वाहतूक सुरू असल्याने नागपूरकडून येणाऱ्या ट्रकने आजदा गावातून येणारे प्रगतशील शेतकरी बाबाराव मुंगल वय ७० वर्ष आपल्या स्कुटीने राष्ट्रीय मार्गावर येत असताना नागपूरकडून भरधाव येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. यात बाबाराव मुंगल, आणि प्रकाश मांडवकर हे रस्त्यावर पडल्याने गंभीर घायल झाले. त्यांना त्वरित ग्रामीण रुग्णालय समुद्रपूर येथे आणले असता उपस्थित वैद्यकीय अधिकारी ने बाबाराव ला मृत घोषित केले. तर प्रकाश मांडवकर ला सेवाग्राम रेफर केले.

दुसरे अपघातात राष्ट्रीय महामार्ग ४४ वर जाम पासून अवघ्या ३ कि.मी. वर असलेले हल्दीराम हॉटेल (डी एन आर) येथे वेल्डिंगचे काम करणारे मजूर रवी नींदिकर वय २८ वर्ष रा. चंद्रपूर आणि विशाल पुंडभरे रा. गोंदिया हे काही सामान आणण्याकरिता समुद्रपूर ला मोटर सायकल ने आले होते. सामान घेऊन परत जाताना नागपूर हुन अतिबेगाने येणाऱ्या कार ने यांना उडविले. यात दोन्ही गंभीर जखमी झाले. दोघांना ग्रामीण रुग्णालय, समुद्रपूर ला आणले, गंभीर परिस्थिती पाहून उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या दोघांना ही सेवाग्राम येथे रेफर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *