तीन वर्षांपासून पसार आरोपी परभणीतून ताब्यात

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे

वर्धा : मागील ३ वर्षांपासून हुलकावणी देत पसार असलेल्या आरोपीस परभणी येथून ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस स्टेशन पुलगाव येथील दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपी चरणसिंग उर्फ रोशनसिंग बादलसिंग जुनी, रा. परभणी जि. परभणी त्याच्या शोध कामी समांतर तपास करीत होते. गोपनीय माहितीच्या आधारे परभणी शहरात शोध घेत असता चरणसिंग उर्फ रोशनसिंग बादलसिंग जुनी हा साफला प्लॉट, परभणी परिसरात मिळून आल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले. आरोपीला पुढील कारवाई करिता पोलीस स्टेशन पुलगाव यांचे ताब्यात देण्यात आले. पुढील तपास पोलीस स्टेशन पुलगाव करीत आहेत.

— ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल इटेकर, पोलीस अंमलदार मनोज धात्रक, महादेव सानप, हर्शल सोनटक्के, अभिषेक नाईक, रितेश गेटमे, सर्व स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा व मिना खैरती, सायबर सेल, वर्धा यांनी केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *