शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्यांच्या समस्यांवर मांडली वस्तुस्थिती; मृगजळ ठरलेली कर्जमाफी आणि ५ हजारांच्या टोकड्या मदतीवर सुद्धा चर्चा
प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे
वर्धा : राज्यात निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती, पाणीटंचाई, शेतकरी आणि शेतमजुरांच्या वाढत्या समस्या तसेच शासनाने जाहीर केलेली फसवी कर्जमाफी आणि पाच हजार रुपयांची टोकडी आर्थिक मदत या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली रविवार, दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पक्षाच्या ५ खासदारांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमर काळे यांनी सहभाग नोंदवत मतदारसंघातील दुष्काळ, पाणीटंचाई आणि शेतकरी-शेतमजुरांच्या विविध समस्यांची सविस्तर मांडणी केली.
राज्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थितीची शेती, शेतीपूरक व्यवसाय, शेतमजूर आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे. पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांसमोर उभ्या राहिलेल्या अडचणी, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, शेतीसाठी आवश्यक पावाची उपलब्धता आणि ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे खासदार अमर काळे यांनी बैठकीत लक्ष वेधले.
वर्धा लोकसभा मतदारसंघातील परिस्थितीची वस्तुस्थिती राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यासमोर मांडत या संकटातून नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. शासनाने जाहीर केलेली फसवी कर्जमाफी आणि शेतकऱ्यांसाठी घोषित केलेली पाच हजार रुपयांची टोकडी आर्थिक मदत या मुद्द्यांवरही बैठकीत चर्चा झाली. सध्याची गंभीर परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांना मिळणारा दिलासा पुरesa आहे का, मदतीचा लाभ प्रत्यक्ष गरजूंपर्यंत कसा पोहोचवता येईल आणि दुष्काळाच्या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी कोणत्या अतिरिक्त उपाययोजना आवश्यक आहेत, यावर चर्चा करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
दुष्काळाचा परिणाम केवळ शेतकऱ्यांपुरता मर्यादित नसून शेतमजूर, लहान व्यावसायिक आणि ग्रामीण भागातील अन्य घटकांवरही होत आहे. त्यामुळे या सर्व घटकांच्या समस्या लक्षात घेऊन शासनाने सर्वकष उपाययोजना करणे आवश्यक असल्याचा मुद्दा या चर्चेत महत्त्वाचा ठरला.
बैठकीत राज्यातील विविध लोकसभा मतदारसंघातील खासदारांकडून स्थानिक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या समस्यांवर मात करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, बाधित नागरिकांना प्रभावी मदत कशी मिळवून देता येईल आणि हे प्रश्न शासनाच्या निदर्शनास आणून त्यावर ठोस निर्णय घेण्यासाठी कोणती भूमिका घ्यावी, याबाबत सविस्तर चर्चा झाली. खासदार अमर काळे यांनी वर्धा लोकसभा मतदारसंघातील प्रश्न मांडत या समस्यांच्या निराकरणासाठी प्रभावी पाठपुरावा करण्याच्या दृष्टीने आपली भूमिका मांडली.
शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा महत्त्वाचा: राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करताना शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळवणे महत्त्वाचे आहे. केवळ आर्थिक मदत जाहीर करण्यापेक्षा ती प्रत्यक्ष गरजूंपर्यंत पोहोचवणे, पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करणे आणि संकटग्रस्त कुटुंबांना आधार देण्यासाठी प्रभावी धोरणे राबवणे आवश्यक आहे.
मुंबईतील या बैठकीच्या माध्यमातून वर्धा लोकसभा मतदारसंघातील दुष्काळ, पाणीटंचाई आणि ग्रामीण जनतेच्या समस्यांना राज्यस्तरीय चर्चेत स्थान मिळाले. या प्रश्नांवर शासनस्तरावर प्रभावी उपाययोजना काव्यात आणि संकटग्रस्त शेतकरी व नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी पुढील पाठपुरावा महत्त्वाचा ठरणार आहे.