ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने कलासृष्टीची कधीही न भरून निघणारी पोकळी

खासदार अमर काळे यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली

प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे

वर्धा : भारतीय सिनेसृष्टी आणि मराठी रंगभूमीवरील आपल्या असामान्य অভিনयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे महान कलावंत आदरणीय नाना पाटेकर यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण देशात आणि कलाविश्वात तीव्र शोककळा पसरली आहे. त्यांच्या या अचानक जाण्याने खासदार अमर काळे यांनी तीव्र दुःख व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

आपल्या शोक संदेशात खासदार अमर काळे म्हणाले की, ‘नाना पाटेकर हे केवळ एक उत्कृष्ट अभिनेतेच नव्हे, तर एक संवेदनशील आणि दिलदार माणूस सुद्धा होते. तसेच ते पद्मश्री पुरस्कृत होते. रंगभूमी असो वा रुपेरी पडदा, त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या सदैव स्मरणार्ह राहील. अभिनय हा केवळ व्यवसाय नसून तो जीवन जगण्याचा एक प्रामाणिक मार्ग आहे, हे त्यांनी आपल्या कृतीतून आणि कलेतून सिद्ध केले.’

पुढे बोलताना ते म्हणाले, ‘नानांचा खणखणीत आवाज, त्यांचा कसदार अभिनय आणि त्यांची समाजात असलेली माणूसी आणि संवेदनशीलता तसेच सामाजिक बांधिलकी कायम आपल्या स्मरणार्ह राहील, त्यांच्या जाण्याने भारतीय कलासृष्टीची कधीही न भरून निघणारी मोठी हानी झाली आहे.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *