पीक फेरबदल केल्याने शेतीचे आर्थिक स्थैर्य टिकून राहील : जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी

कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा आयोजित शेती दिनाच्या औचित्याने शेतकऱ्यांचे निरसन

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे

वर्धा : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा च्या वतीने शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे सदस्य देवळी तालुक्यातील रत्नापुर येथील प्रगतशील शेतकरी श्री. इρφान अली यांच्या शेतावर ‘पीडीकेव्ही अंबा’ (AMS 1001) या सोयाबीनच्या सुधारित वाणाच्या गट पिक प्रात्यक्षिक क्षेत्र वर ‘शेती दिन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर प्रसंगी प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. अरविंद उपरीकर व वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. जीवन कटोरे उपस्थित होते. या कार्यक्रमात परिसरातील शेतकऱ्यांना या वाणांची वैशिष्ट्ये, कीड व रोग व्यवस्थापन आणि आधुनिक उत्पादन तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष शेतावर पाहणी करून सविस्तर माहिती देण्यात आली.

सोयाबीन चे पिडीकेव्ही अंबा हे वाण कीड व रोगांना बळी पडणारे नसून अधिक उत्पन्न देणारे वाण आहे. सध्याची पिक परिस्थिती पाहता शेतकऱ्यांनी पिक फेरबदल केल्याने शेतीचे आर्थिक स्थैर्य टिकून राहील व नुकसान कमी होईल. तीळ किंवा सूर्यफुल यांसारख्या पिकांचा अवलंब केल्याने कमी वेळेत अधिक उत्पन्न मिळू शकते. या सोबत मधुमक्षिका पालन सारखे कृषि पूरक व्यवसाय केल्याने वर्षभर उत्पन्नाचा स्रोत निर्माण होऊ शकतो असा सल्ला जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. अरविंद उपरीकर यांनी शेती दिन कार्यक्रमा दरम्यान उपस्थित शेतकऱ्यांना दिला.

वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. जीवन कटोरे यांनी शेती दिनाचे उद्दिष्ट स्पष्ट करीत एलनिनो च्या परिस्थितीनुसार सोयाबीन पिडीकेव्ही अंबा वाण हे इतर वाणांच्या तुलनेत कसे आहे हे प्रत्यक्ष बधिताल्याने वाणाबद्दल शाश्वती येते यावर भर तसेच सोयाबीन, तूर व कपाशी पिकातील अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले तसेच शेतकरी-शास्त्रज्ञ चर्चासत्र दरम्यान शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. कृषिविद्या विषयतज्ज्ञ डॉ. भारती तिजारे यांनी सोयाबीन पिडीकेव्ही अंबा वाणाचे वैशिष्ट्ये विशद केले तसेच शेतकऱ्यांच्या शेतावर गट पिक प्रात्यक्षिके यशस्वीपणे राबविले.

सदर प्रसंगी प्रगतशील शेतकरी श्री. इρφान अली यांनी सोयाबीन चे पिडीकेव्ही अंबा हे वाण टोकन यंत्राद्वारे पेरल्याने ओळींची संख्या जास्त भरली व एकरी ८ ते ९ क्वि. उत्पादन येण्याची हमी दर्शविली. शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाचे सदस्य श्री. प्रीतम कडూ यांनी रुंद वरंबा व सरी चा अवलंब केल्याने काय फायदे झाले याविषयीचा अनुभव कथन केला.

यांनी जनावरांना मुक्त संचार गोठा पद्धतीने ठेवल्यास जनावरांना आवश्यक असेल तेव्हा चारा खाऊ शकतात व पाणी पिहू शकतात ज्यामुळे दुग्ध उत्पादनावर अधिक फरक पडेल असे मार्गदर्शन करीत जनावरांचे खाद्य निर्मिती, विविध प्रकारंचे चारा लागवड व त्याचा दुग्ध जनावरांना होणारा फायदा व एलनिनो दरम्यान जनावरांकरिता करावयाच्या उपाययोजना यावर भर दिला.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विस्तार शिक्षण विषयतज्ज्ञ डॉ. अंकिता अगांईतकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता श्री. सुधीर बोबडे, श्री. सौरभ कडकू, श्री. अजय झाडे, श्री. काटकर, कु. भारती सावरकर, कु. स्नेहल इंगोले, श्री. गजेंद्र मानकर, श्री. गणेश कावरे, श्री. वैभव चौधरी व अमरशानी यांनी योगदान दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *