पहिली वर्धा जिल्हा खुली बॅडमिंटन स्पर्धा उत्साहात
प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे
वर्धा : खेळाडूंना दर्जेदार सुविधा, सरावासाठी अत्याधुनिक पाभभूत सुविधा आणि स्पर्धांचे सातत्यपूर्ण आयोजन मिळाले, तर वर्ध्यातून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरवरील खेळाडू घडू शकतात. शासनाच्या क्रीडा धोरणाचा उद्देश केवळ मैदानाची निर्मिती करणे नसून ग्रामीण व जिल्हास्तरावरील गुणवंत खेळाडूंना संधी उपलब्ध करून देणे हा आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.
वर्धा जिल्हा क्रीडा संकुलातील नवर्निर्मित अत्याधुनिक चार कोर्टच्या बॅडमिंटन हॉलमध्ये आयोजित पहिली वर्धा जिल्हा खुली बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात पार पडली. महात्मा गांधी जयंतीनिमित्त २ ते ४ ऑक्टोबरदरम्यान झालेल्या या तीन दिवसीय स्पर्धेत विविध वयोगटांतील २५० हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदविला. पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या विशेष पुढाकारातून जिल्हा क्रीडा संकुलात सर्व सोयींनी युक्त बॅडमिंटन हॉलची निर्मिती करण्यात आली आहे. या सुविधेचा स्थानिक तसेच नवोदित खेळाडूंना लाभ मिळावा, त्यांना स्पर्धात्मक वातावरण उपलब्ध व्हावे आणि वर्धा जिल्ह्यातील क्रीडा संस्कृतीला चालना मिळावी, या उद्देशाने मॉर्निंग बॅडमिंटन क्लबच्या पुढाकाराने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
स्पर्धेच्या समापनप्रसंगी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते विजेता व उपविजेत्या खेळाडूंना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आयोजकांचे अभिनंदन करताना सांगितले की, ‘खेळ हा केवळ स्पर्धेपुरता मर्यादित नसून शिस्त, संघभावना, आत्मविश्वास आणि नेृत्वगुण घडविण्याचे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे शालेय आणि युवा खेळाडूंना अधिकाधिक स्पर्धंमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. वर्धा जिल्ह्यात उपलब्ध झालेल्या अत्याधुनिक क्रीडा सुविधांचा उपयोग स्थानिक खेळाडूंनी मोठ्या प्रमाणावर करावा, तसेच भविष्यात जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी आवश्यक सहकार्य देण्याचे आश्वसनही पालकमंत्रींनी दिले. वर्च्याची ओळख क्रीडा क्षेत्रातही निर्माण व्हावी, यासाठी खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडा संघटनांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यांतील खेळाडूंचा सहभाग
स्पर्धेचे उद्घाटन २ ऑक्टोबर रोजी पारधी, अजयझिले, पाटील, आशिषकाळमेघ, ज्येष्ठ नागरिक कडू आणि निहाल देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. वर्ध्यासह हिंगोली, यवतमाळ, अमरावती, नागपूर, भंडारा तसेच मध्य प्रदेशातील खेळाडूंनी स्पर्धेत सहभाहीत होत उत्कृष्ट क्रीडाकौशल्याचे प्रदर्शन केले.
प्रमुख विजेते व उपविजेते
-
पुरुष खुला एकेरी: विजेता प्रफुल्ल पाठक (मध्य प्रदेश); उपविजेता आशु ठावरे (नाश्तिक).
-
पुरुष खुला दुहेरी: विजेते यश गोवर्धन व जोडीदार (वर्धा), उपविजेते पलाश गुजर व रोहित मोहर (वर्धा).
-
महिला खुला दुहेरी: विजेता कुद्दी बोग व गोनिका राजपूत (वर्धा); उपविजेत्या गरिमा मुडके व मनस्वी ಅಗలాवे (वर्धा).
-
४० वर्षांवरील गट: विजेते पंकज राठोड व संतोष कदम (हिंगोली); उपविजेते सुनील राठोड व रुपेश सोनी (हिंगोली).
-
५० वर्षांवरील गट: विजेते भरत बालघाट व जोडीदार (भंडारा); उपविजेते – डॉ. श्रीकांत जांभूळकर व विवेक मिश्रा (नाग्पूर).
-
टंग ९० विजेते: पप्पू रिजवी व रोहित मोहर (वर्धा); उपविजेते – पंकज राठोड व संतोष कदम (हिंगोली).
-
बाल गटातही वर्ध्याच्या खेळाडूंची चमक (अमरावती): विजेती, आश्रेया जोडे (वर्धा) उपविजेती, अंडर-१७ मुली वृद्धी बांग (वर्धा) विजेती, मनस्वी अगलवर्वे (वर्धा) उपविजेती.
-
अंडर ११ मुले: राघव निवास्ती (वर्धा) विजेता, दिवित पारेख (अकोला) उपविजेता.
-
अंडर १३ मुले: आराध्य कळसकर (वर्धा) विजेता, वेदांत काकरवाल (वर्धा) उपविजेता.
-
अंडर १५ मुले: वेदांत काकरवाल (वर्धा) विजेता, सोहम पटेल (वर्धा) उपविजेता.
-
अंडर १७ मुले: प्रफुल्ल पाठक (मध्य प्रदेश) विजेता, राघव अनासाने (वर्धा) उपविजेता.
-
अंडर-११ मुली: सान्वी बारवट (वर्धा) विजेती, राजनंदिनी सद्याम (वर्धा) उपविजेती.
-
अंडर-१३ मुली: आश्रेया जोडे (वर्धा) विजेती, सान्वी राऊत (अमरावती) उपविजेती.
-
अंडर-१५ मुली: प्रेरणा नानबाणी (अमरावती) विजेती, आश्रेया जोडे (वर्धा) उपविजेती.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती मेश्राम, शिवानंद पाटील, राहुल जाधव, राहुल ठाकूर, पुरुषोत्तम टोणपे, अजय झरकर, निरज गुजर, किरण मानकर, प्रशिक्षक रोहित मोहोह, मायकल गवई, दिलीप अंधारे, उमेश पांडे, अक्षत नागरगोझे, प्रशिक्षक प्रतीक बोधे, मनोज झाडे, नितीन झाडे, पलाश तसेच इतर सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप सोणे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार जिम्मी कुपल्नी यांनी मानले.