पालकमंत्री डॉ. भोयर यांनी केली सेलू पंसच्या इमारतीची पाहणी

प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे वर्धा : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सेलू येथे साकारत असलेल्या पंचायत समितीच्या नवीन इमारतीची पाहणी करीत आवश्यक त्या सूचना संबंधित अधिका-यांना दिल्या. यावेळी पंचे गटविकास अधिकारी देवानंद पानबुडे, उपअभियंता विवेक राठोड, कनिष्ठ अभियंता सागर कथले यांच्या सह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

सेलू पंचायत समितीची इमारत जीर्ण झाली होती. पावसाळ्याच्या दिवसात अनेक ठिकाणी पाणी गळत असल्याने कामकाजाचा खेळखंडोबा होत होता. इमारत जुनी असल्याने प्रशासनिकदृष्ट्या कामकाज करताना अडचणी येत होत्या.

ही बाब लक्षात घेऊन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा करून पंसच्या नवीन इमारत बांधकामासाठी १२.४६ कोटी रूपयांचा निधी मंजूर करून आणून, आता पंसच्या परिसरात नवीन इमारतीच्या बांधकामास प्रारंभ झाला आहे. तीन मजली प्रशासकीय इमारत राहणार आहे. यामध्ये सर्व सोयीसुविधा उपलब्ध राहणार आहे. यामध्ये लिफ्ट, सोलर, पावर बॅकअप, आधुनिक फर्निचर, अधिकारी यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष मिटिंग हॉल, कॉन्फरन्स हॉल राहणार आहे.

१०५१.३५ स्क्वेअर मीटर बांधकाम करण्यात येत आहे. सदर बांधकामाची पालकमंत्री डॉ. भोयर यांनी मंगळवारी पाहणी केली. गुणवत्तापूर्ण काम करण्यासोबतच मार्च पूर्वी काम पूर्ण करण्यात यावे, अशी सूचना केली. यावेळी माजी पंख सभापती अशोकराव मुडे, माजी पंख सदस्य अशोक कलोडे, भाजपचे तालुका अध्यक्ष प्रफुल्ल खोडे, घोराडच्या माजी सरपंच ज्योती घंगारे, विलास वरटकर, दिनेश कामिनकर, राजू लिडबे, विकास मोटमवार व भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *