वर्ध्यात प्रथमच आंतरराष्ट्रीय FIDE रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे

वर्धा : जिल्ह्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या ‘1st G H Raisoni Wardha International FIDE Rapid Rating Chess Tournament 2026’ या स्पर्धेने वर्धेच्या क्रीडा इतिहासात नवा अध्याय जोडला. गांधी सिटी चेस असोसिएशन, जी.एस. रायसोनी स्पोर्ट्स कल्चर फाउंडेशन आणि कल्पना वेलफेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा चत्रावार्स ई-विद्या मंदिरात आयोजित करण्यात आली. या स्पर्धेला देशभारतील बुद्धिबळपटू आणि क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

स्पर्धेत देशातील विविध राज्यांमधून खेळाडूंनी सहभाग घेतला. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे ५ ते ७५ वर्षे वयोगटातील महिला आणि पुरुष खेळाडूंनी एकाच व्यासपीठावर आपल्या बुद्धिबळ कौशल्याचे प्रदर्शन केले. स्पर्धा एकूण ९ फेऱ्यांमध्ये आयोजित करण्यात आली. भारतातील दोन इंटरनॅशनल मास्टर्स (इम) यांच्या विशेष उपस्थितीमुळे या आयोजनाची शोभा वाढली.

बुद्धिबळाच्या पहिल्या चालीने स्पर्धेचा शुभारंभ

स्पर्धेचे उद्घाटन ४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता महाराष्ट्राचे राज्यमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर आणि माजी खासदार श्री. रामदासजी तडस यांच्या हस्ते झाले. उद्घाटन सोहळा विशेष ठरावासाठी दोन्ही मान्यारांनी स्वतः बुद्धिबळाच्या पटावर चाल खेळून स्पर्धेचा विधिवत शुभारंभ केला. जनप्रतिनिधींनी बुद्धिबळ खेळून स्पर्धेचा प्रारंभ केल्याने खेळाडू आणि क्रीडाप्रेमींमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला.

यावेळी डॉ. पंकज भोयर यांनी देशभरातून आलेल्या सर्व खेळाडूंचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या, तेम्हणाले, “बुद्धिबळ हा केवळ एक खेळ नसून बुद्धिमत्ता, एकाग्रता, संयम, धैर्य आणि रणनीतीचा कस पाहणारा बौद्धिक खेळ आहे.” तेम्हणाले की, अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा स्थानिक आणि नवोदित खेळाडूंना आपली प्रतिभा सिद्ध करण्यासाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देतात. वर्धा जिल्ह्यात क्रीडा संस्कृती बळकट करण्यासाठी आणि बुद्धिबळासारख्या बौद्धिक खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी शासन तसेच स्थानिक प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.

आयोजन समिती आणि मान्यवर नागरिक उपस्थित

उद्घाटन सोहळ्यात आयोजन समितीचे भूषण श्रीवास, जिल्हा चेस असोसिएशनचे अध्यक्ष नरेश चांडक, सचिव ॲड. हरीश चांडक, कोषाध्यक्ष विशाल गठी, निखिल फारीकर, अभिषेक वोग्रा, चंद्रशेखर पालेकर, दीपक जैन, FA ओजस राऊत, स्नेहळ चांडक, रुची जैन आणि नंदकिशोरजी चांडक यांच्यासह अनेक मान्यवर नागरिक उपस्थित होते. चत्रावार शाळेच्या वतीने संचालक दिनेशजी चत्रावार, शुमार्थी चत्रावार, प्राचार्या अपूर्वा पांडे, आशिषजी झोडे आणि तरूणा झोडे यांची विशेष उपस्थिती होती. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी चत्रावार्स ई-विद्या मंदिरातील सर्व कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले.

बालकांपासून ज्येष्ठ खेळाूपर्यंत उत्साह सकाळपासूनच स्पर्धास्थळी देशाख्त विविध भागातून आलेल्या खेळाडू आणि बुद्धिबळप्रेमींची गर्दी होती. विविध वयोगटातील स्पर्धकांमध्ये पूर्ण उत्साह, एकाग्रता आणि क्रीडाभावाने सर्व ९ फेऱ्यांमध्ये सहभाग घेतला. लहान मुलांपासून अनुभवी खेळाूपर्यंत सर्वांनी आपल्या रणनीती कौशल्याचे प्रभावी प्रदर्शन केले. ५ वर्षांच्या चिमुकल्या खेळाूपपासून ते ७५ वर्षांच्या अनुभवी स्पर्धकांपर्यंतच्या सहभागाने हे सिद्ध केले की बुद्धिबळ हा वयाच्या सीमा ओलांडून सर्व पिढ्यांना जोडणारा बौद्धिक खेळ आहे.

समारोप सोहळ्यात विजेत्यांना पुरस्कार स्पर्धेचा समारोप सायंकाळी ५:३० वाजता आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात झाला. समारोप समारभात ट्रान्सरेल लाईटिंग कंपनीचे महाव्यवस्थापक अजयजी जुमडे, वर्ध्याचे थानेदार नागेशजी चतरकर आणि नगर परिषद अध्यक्ष सुधीर भाऊ पांगुल यांनी विजेते तथा उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पुरस्कार आणि पारितोषिके प्रदान केली.

प्रारंभाचे प्रभावी आणि दिमाखदार सूत्रसंचालन चत्रावार्स ई-विद्या मंदिरातील शिक्षिका कंचन मिश्रा आणि श्वेता गांधी यांनी केले.

वर्धातून दोनदा आयोजित केली जाणार स्पर्धा

यावेळी जिल्हा चेस असोसिएशनचे अध्यक्ष नरेश चांडक यांनी घोषणा केली की, जिल्ह्यात बुद्धिबळ अधिक लोकप्रिय करण्यासाठी आणि नव्या प्रतिभेना प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन वर्धातून दोनदा केले जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *