प्रतिनिधी / दै. प्रतापगड़चे वारे-वर्धा – सेवाग्राम ग्रामपंचायतीच्यावतीने हनुमान मंदिर पासून सिमेंट रोडचे काम चालू केले असून ते काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी या कामासाठी माती मिश्रित वाळू मिश्रण करण्यात येत आहे.
नियमानुसार या रोडचे काम होत नाही. असा आरोप युवा नेता मिनाज शेख यांनी केला आहे.आज अभियंत्याने भेट देऊन या कामाची पाहणी केली. कंत्राटदाराविरुद्ध काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.