शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करा; वर्धा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सरसकट कोरडा दुष्काळ जाहीर करा!

हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्या: श्रीकांत दोंड

वर्धा: वर्धा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील शेतकरी सध्या पावसातील अनिश्चितता, पिकांचे नुकसान, वाढता उत्पादन खर्च आणि शेतीमालाला अपेक्षित भाव न मिळाल्यामुळे गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, सरसकट कोरडा दुष्काळ जाहीर करणे आणि पिकांच्या नुकसानीपोटी हेक्टरी ५०,००० हजार रुपये नुकसानभरपाई देणे, या प्रमुख मागण्यांसाठी आम आदमी पार्टीचे वर्धा जिल्हाध्यक्ष श्रीकांत ब. दोंड यांच्या नेतृत्वाखाली आज मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले.

वर्धा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील शेतकरी सध्या अत्यंत गंभीर आर्थिक व नैसर्गिक संकटातून जात आहे. अनियमित पाऊस, पावसातील मोठे खंड, अपुरा पाऊस, वाढता उत्पादन खर्च, महामगी खते-बियाणे, कीड व रोगांचा प्रादुर्भाव तसेच शेतीमालाला अपेक्षित भाव न मिळणे यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे.

विशेषतः वर्धा जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसाच्या अनिश्चिततेमुळे खरीप हंगामातील पिकांवर गंभीर परिणाम झाला असून, अनेक शेतकऱ्यांसमोर उत्पादन खर्चही वसूल होण्याचे संकट निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत केवळ पारंपरिक मदत किंवा कर्जाचे पुनर्गठन करून शेतकऱ्यांच्या समस्येचे निराकरण होणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *