आर्वीच्या तालुक्याच्या विकासाला नवी दिशा

पिंपरी (भुतडा) येथे १ कोटी ४० लाखांच्या कामाचे खासदार अमर काले यांचे हस्ते लोकार्पण व भूमिपूजन

स्थानिक गरजा जाणुन् घेऊन विकास कामांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न

प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे

वर्धा : आर्वी विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने पिंपरी (भुतडा) येथे विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन खासदार अमर काले यांच्या हस्ते रविवारी, दि. २० सप्टेंबर रोजी करण्यात आले. पशुवैद्यकीय सेवा, ग्रामपंचायत प्रशासन, शालेय सुविधा आणि रस्ते या मूलभूत बाबींना या कामांमधून प्राधान्य देण्यात आले आहे.

या अंतर्गत ५२ लाख रुपयांच्या पशुवैद्यकीय दवाखाना इमारतीचे, २२ लाख रुपयांच्या ग्रामपंचायत भवनाचे तसेच २० लाख रुपयांच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या संरक्षण भिंतीचे लोकार्पण करण्यात आले. याशिवाय पिंपरी बस स्टॉप ते शेवंताबाई धुर्वे यांच्या घरापर्यंतच्या डांबरीकरणाच्या ४६.९० लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

गावच्या गरजेनुसार विकासकामांना प्राधान्य

गावातील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या व स्थानिक गरजा जाणून घेऊन विकासकामांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पशुधनासाठी आवश्यक असलेल्या पशुवैद्यकीय सुविधेपासून ग्रामपंचायत भवन, शाळेची सुरक्षा आणि रस्त्यापर्यंत विविध क्षेत्रांतल कामांना मंजुरी मिळाल्याने गावाच्या मूलभूत सुविधांमध्ये भर पडणार आहे.

रस्ते, शिक्षण, पशुवैद्यकीय सुविधांवर भर

पिंपरी येथील डांबरी रस्त्यामुळे नागरिकांच्या दळणवळणाची सुविधा सुधारण्यास मदत होणार आहे. शाळेच्या संरक्षण भिंतीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सुविधा निर्माण होणार असून, नवीन पशुवैद्यकीय दवाखान्यामुळे शेतकरी व पशुपालकांना स्थानीय पातळीवर सेवा उपलब्ध होण्यास मदत होईल.

जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न

‘गावातील नागरिकांच्या गरजा आणि प्रश्न समजून घेऊन त्यानुसार विकासकामांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल,’ अशी भूमिका खासदार अमर काले यांनी यावेळी मांडली.

छायाचित्र व खालील मजकूर:

कार्यक्रमाला सरपंच श्री. रज्जाकभाई तसेच गावातील मान्यवर मंडळीसह सर्व ग्रामस्थ, महिला, युवक, शेतकरी, विद्यार्थी तसेच स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *