दहेगाव (गोसावी) ग्रामपंचायतीचा लाखावधींचा महाघोटाळा

बोगस ठराव आणि खोडतोड प्रकरणी सरपंच-ग्रामसेवकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी तीव्र!

अभय बेदमोहता
प्रतिनिधी/ दै. प्रतापगडचे वारे
सेलू : सेलू तालुक्यातील दहेगाव (गोसावी) ग्रामपंचायतीमध्ये एक अत्यंत गंभीर आणि संतापजनक गैरव्यवहार उघडकीस आला आहे. आर्थिक लाभासाठी सरपंच आणि ग्रामसैवकाने संगनमताने शासकीय दप्तरात थेट खोडतोड करून बोगस ठराव व बोगस ना हरकत प्रमाणपत्र तयार केल्याचा पर्दाफाश शेकडो ग्रामस्थांनी केला आहे. याप्रकरणी प्रशासकीय चौकशी वेगाने सुरू असून, दोषीवर तात्काळ कठोर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांकडून आक्रमकपणे केली जात आहे. मौजा किन्हाळा येथील सर्व्हे नं. २६/१/२ मधील दोन हेक्टर जागेवर नवीन गौण खनिज खानपट्टा मंजूर करण्यासाठी ग्रामसभेची मंजुरी बंधनकारक होती. मात्र, सरपंच आणि ग्रामसेवक यांनी २० मे २०२६ च्या मासिक सभेचा ठराव क्रमांक ७ हा २९ मे २०२६ ची खोटी ग्रामसभा दाखवून पूर्णपणे बोगस तयार केला? ? यासाठी गावकऱ्यांची कोणतीही परवानगी किंवा संमती न घेताच १२ जून २०२६ रोजी तहसीलदार कार्यालयाला बोगस ना हरकत प्रमाणपत्र सादर करण्यात आली. ? यासाठी प्रोसिडिंग बुकमध्ये वेगवेगळ्या पेनाचा वापर करून खोडतोड करण्यात आली आणि खोटा पुरावा खरा म्हणून सादर करण्यात आला.

ग्रामस्थांकडे याचे भक्कम फोटो व व्हिडिओ उपलब्ध आहेत. ?दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी गटविकास अधिकारी, सेलू देवानंद पयाबुलडे यांच्या पथकाने ग्रामपंचायतीचे ८ रजिस्टर जप्त केले होते. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी ग्रामस्थांनी दहेगाव गोसावी पोलीस ठाण्यात BNS कलम ३१८(४), ३३६(३) आणि ३४० अंतर्गत कायदेशीर तक्रार दाखल केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. वर्धा यांच्या आदेशानुसार दि.१७ सप्टेंबर २०२६ रोजी पंचायत समिती आष्टीचे गटविकास अधिकारी मयूर पोकळे व विस्तार अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी प्रत्यक्ष दहेगाव गावात येऊन ग्रामस्थांच्या उपस्थितीत सखोल चौकशी करत सर्व कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. चौकशी समितीने आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आश्वासन देखील दिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले, ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या या खालील प्रमाणे आहेत – किन्हाळा व दहेगाव परिसरातील सर्व गौण खनिज खदानांचे ना हरकत प्रमाणपत्र तात्काळ रद्द करून त्या बंद करण्याचे आदेश जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी द्यावेत.

बोगस कागदपत्रे तयार करणारे सरपंच व ग्रामसेवक यांना तात्काळ आदेशाने निलंबित करावे. जप्त केलेले मूळ प्रोसिडिंग बुक सत्यता पडताळणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवावे. व ग्रामपंचायतीच्या मागील ५ वर्षांच्या विकासकामांचे विशेष लेखापरीक्षणाची प्रत देण्यात यावी व त्याची सखोल तपासणी करावी. याकडे संपूर्ण वर्धा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. तसेच आमच्याकडे भरमक्कम पुरावे असूनही वेळेत योग्य न्याय न मिळाल्यास विभागीय चौकशी, स्पेशल ऑडिटची मागणी करीत माहितीचे अधिकारार्थ ग्रामपंचायत कडून ५ वर्षांचा लेखापाल अहवाल मागण्याच्याही तयारी असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. चौकशी दरम्यान रामकिशोर शिंगनधुपे, प्रणव शेंडे, डॉ. सुरेश धंदरे, अमोल पिठाळे, सुरेन्द्र तिवाडे, संजय पिसुडे, शुध्दा खाडे, मंगेश तिजारे, उमेश राऊत, श्रीकांत जोवणे, गोलू सावरकर, सचिन महाबुषे यांच्यासह ग्रामस्थ, दहेगाव (गो) व किन्हाळ्या उपस्थित होते. यात दोषी आढळत्यांवर तात्काळ कठोर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. ?या सर्वत्र गाजਤ असलेल्या संपूर्ण प्रकरणामुळे वर्धाजिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, आता प्रशासकीय पातळी पर काय कठोर कारवाई होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *