वर्ध्यातील १८६७ मधील ब्रिटिशकालीन जिल्हा कारागृह पुरातन प्राचीन वास्तू म्हणून जतन करा

जिल्हा कारागृह पाडण्यास खासदार अमर काळे यांचा तीव्र विरोध : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे
वर्धा : येथील सन १८६७ मध्ये बांधण्यात आलेले १८० वर्षांची परंपरा असलेले इंग्रजकालीन ऐतिहासिक जिल्हा कारागृह पाडून नवीन इमारत बांधण्याच्या प्रशासकीय हालचालींना वर्धा लोकसभा क्षेत्राचे खासदार अमर शरदराव काळे यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. ही ऐतिहासिक वास्तू न पाडता तिचे जतन करावे आणि नवीन कारागृहासाठी पर्यायी जागेचा वापर करावा, अशी मागणी करणारे अधिकृत पत्र खासदार काळे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे.

पत्रकात खासदार अमर काळे यांनी नमूद केले की, वर्धा जिल्हा कारागृhala मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. भारताच्या स्वातंत्रळढ्यात मोलाचे योगदान देणाऱ्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी या कारागृहात आपल्या शिक्षेचा काळ व्यतीत केला आहे. आज १५० हून अधिक वर्षानंतरही या वाστूत स्वातंत्रळढ्याच्या स्मृती जिवंत आहेत. ही इमारत आजही अत्यंत सुस्थितीत आणि ‘भरभक्कम असताना ती पाडणे म्हणजे शहराचा आणि देशाचा गौरवशाली इतिहास पुसून टाकण्यासारखे आहे.

वर्तमानपत्रातील वृत्तानुसार, वर्ध्यातील सालोद येथे नवीन कारागृह उभारणीसाठी प्रशासनाकडून जागेचा शोध घेतला जात आहे. परंतु, मध्य शहरातील जुनी इमारत पाडून ती मोकळी केलेली जागा खासगी व्यक्तींच्या किंवा बिल्डरांच्या घशात घालण्याचा स्थानिक प्रशासनाचा डाव असू शकतो, असा संशयही खासदार काळे यांनी पत्रात व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *