मृद व जलसंवर्धानासाठी आयोजित महा वॉॅकेथॉनमध्ये हजारोंचा सहभाग

हिरवी झेंडी दाखवून महा वॉॅकेथॉनचा शुभारंभ

प्रथम दहा विजेत्यांना रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र

वर्धा (जिमाका): राज्यातील जलसंधारणाराचे प्रणेते माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा २१ ऑगस्ट हा जयंती दिन तसेच जलसंधारण दिनानिमित्त मृद व जलसंधारणाच्या जनजागृतीसाठी आयोजित महा वॉॅकेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकातून सुरू झालेल्या वॉॅकेथॉनला नागरिक, विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी, विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येत उपस्थित जलसंधारणाचा जागर केला.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात सुरुवातीस मृद व जलसंवर्धानाची शपथ घेण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्याहस्ते हिरवी झेंडी दाखवून महा वॉॅकेथॉनचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अरविंद उपरीकर, जिल्हा परिषदेचेजिल्हा जलसंधारण अधिकारी आशिष गंधे, कृषि विज्ञान केंद्र सेलसुराचे वरिष्ठ शास्त्रज्ञ जीवन कटोरे, मृद व जलसंवर्धानाचे उप अभियंता सुदेश ससाने, अक्षय बेंद्रे, निकिता देशमुख आदी उपस्थित होते.

शुभारंभानंतर वॉॅकेथॉन महात्मा गांधी चौक, शासकीय विश्रामगृह, नगर परिषद, कारागृह, पोस्ट ऑफिस समורून मार्गक्रमण करत पुन्हा आंबेडकर चौकात येथे दाखल झाली व समारोप तसेच बक्षिस वितरणाचा कार्यक्रम झाला. महा वॉॅकेथॉन मध्ये सहभागी झालेली प्रथम १० सहभागी्यास मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्रदेऊन मान्यवरांच्याहस्ते गौरविण्यात आले.

यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना नगराध्यक्ष सुधीर पांगुळ म्हणाले, दिवसेंदिवस होत असलेला पर्यावरणाचा ह्रास व वृक्षतोडीमुळे विपरीत परिस्थिती निर्माण होत आहे. जमिनीतील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे. भविष्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रत्येकाने किमान एका वृक्षाचे रोपण करून त्याचे जतन करणे आवश्यक आहे. सोबतच पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीus मुरविणे ही काळाची गरज असल्याचे श्री.पांगुळ म्हणाले.

वॉॅकेथॉनमध्ये सहभागीतांनी हातात मृद व जलसंवर्धन संवर्धनाचे फलक घेतले होते. जनագրूतीपर घोषणा देत वॉॅकेथॉन पुढे जात असताना वर्धाकरांचा उत्स्फूर्त सहभाग मिळत होता. शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी घोषणा देत असताना पाणी वाचवा, पाणी अडवाचा संदेश व जागर यावेळी होत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *