वीरमाता, वीरपत्नींचा सत्कार, उत्कृष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरववर्धा (जिमाका) : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनाचा मुख्य सोहळा पोलिस कवायत मैदान येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात राज्याचे गृह, गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण व सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी वानमथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अप्पर जिल्हाधिकारी संजय तेली, भारतीय प्रशासनिक सेवेतील परिविक्षाधीन अधिकारी शोभिका पाठक तसेच माजी सैनिकांचे कुटुंबिय, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री डॉ. भोयर यांच्याहस्ते वीरमाता नलिनी टिपले, वीरपत्नी मंदा कोल्हे यांचा यांचा सत्कार करण्यात आला. तसेच तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथील घरफोडी गुन्ह्यातील आरोपीला हिंगणघाट तालुक्यातील दारोडा टोलनाका येथे नाकाबंदी करून घरफोडीतील अट्ठल तीन आरोपीस अटक केल्याबद्दल वर्धा पोलिस दलातील अधिकारी व अंमलदार यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यात सहायक पोलिस निरीक्षक घनश्याम पाटील, पोलिस उपनिरीक्षक भारतकुमार वर्मा, सहायक फौजदार प्रशांत भाइमारे, पोलिस हवालदार समीर कामडी व पोलिस शिपाई संदीप बदकी यांचा समावेश आहे. तसेच वर्धा जिल्हा पोलिस दलात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोलिस निरिक्षक विनोद चौधरी, पोलिस हवालदार शिवकुमार कुंभार, गजानन लामसे यांचाही सत्कार करण्यात आला.
राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र नाचणगावला राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त झाल्याबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील बेले व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद झाडे यांचाही पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
जलसंधारण स्पर्धेचा लोगो व पुस्तकाचे विमोचन
यावेळी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याहस्ते माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची जयंती व जलसंधारण दिनानिमित्त मृद व जलसंधारण विभागामार्फत २१ ऑगस्ट रोजी महाव्हॉर्केथॉन’त्इद्ी’चे आयोजन करण्यात आले आहे. महाव्हॉर्केथॉनच्या लोगोचे प्रकाशन तसेच अनय श्रीरंग पंडित यांच्या स्वातंत्र्य सैनिकांवर आधारित ‘स्वातंत्र्याच्या ज्वाला’ या ७ व्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.