सार्वजनिक बांधकाम विभागात निविदा मॅनेजचा गोरखधंदा
प्रतिनिधी/ दै. प्रतापगडचे वारे
वर्धा : वर्धा जिल्ह्यात गैरप्रकाराला उधाण आले आहे. अनेक प्रकारे वर्धा जिल्हा परिषद बांधकाम विभाग चर्चेत असतांना आता निविदा मॅनेज करण्याचा गोरखधंदा चालू असल्याने हा विभाग पुन्हा चर्चेत आला आहे.
या विभागाचा फेरफटका मारला असता कंत्राटदारांनी दिलेल्या माहितीनुसार या विभागात अकुशल कामे देण्याचा जि आर असतानाही ४० लाख ३० लाखाची कामे मॅनेज करुन वाटप करीत असल्याचा आरोप अनेक कंत्राटदारांनी केला आहे. तर कुशल कामे देण्यात येत आहे. टक्केटवारी घेवून खुले आम हा गोरखधंदा चालु असल्याची माहिती अनेकांनी दिली. सुशिक्षित ईजीनअर यानां अकुशल कामे देण्यात येत आहे. वाटरपूफींग चे कामे ईजीनअर लोकांना न देता मजुर सोसायटी यानां देण्यात येत असल्याचा आरोपही कंत्राटदारांनी केला आहे.
हे वाटर पूफींग काम केल्या नंतर पाच वर्षां पर्यंत या कामाची ग्यारंटी असते असे कुशल कामे मजुर सोसायटीला देता येत नाही. तरी कुशल कामे टक्केटवारीने याकामाचे वाटपाचा गोरखधंदा खुले आम चालु आहे.
जिल्हा परिषद बांधकाम विभागात ५० कुशल कामे मजुर सहकारी संस्थेबर ई निविदेबर लाबण्यात आली आहे. या कामातही मोठ्या प्रमाणात देवाण घेवाण झाली असल्याचा आरोप करीत या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी कंत्राटदारांनी केली आहे. ही सर्व कामे आर्थिक व्यवहारातून होत असून याची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या गंभीर प्रकरणानं जिल्हा परिषद बांधकाम खाते चर्चेत आहे. या संदर्भात जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गुंडतवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होवू शकला नाही. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया कळू शकली नाही.