नागपूर-वर्धा रेल्वे लाईनवर सेलू रेल्वे स्टेशनवर उड्डाणपूल मंजूर

खासदार अमर काळे यांच्या पाठपुराव्याला यश

वर्धा : वर्धा-नागपूर रेल्वे लाईनवर सुकळी रोडवरून रेल्वे लाईन ओलांडताना होत असलेल्या त्रासाला कंटाळून तेथील नागरीकांनी सेलू रेल्वे स्टेशनजवळ उड्डाणपुलाची खासदार अमर काळे यांचेकडे मागणी केली. खासदार अमर काळे यांनी याबाबत रेल्वे विभागाला पत्र दिले व सतत पाठपुरावा केला. खासदार अमर काळे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश म्हणून रेल्वे विभागाने रेल्वे किमी ७७७/२४.२६ वर गट नं. ९६ हटवून त्या ठिकाणी रु. ३४.८१ कोटीचा रेल्वे उड्डाण पुलाला मंजुरी दिली आहे. रेल्वे विभागाने त्यांचे पत्र दि. २५.६.२०२६ नुसार खासदार अमर काळे यांना माहिती दिली आहे. रेल्वे विभागाने या उड्डाण पुलासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया सुरु झाली असून या उड्डाण पुलाचे संकल्पचित्र सुद्धा मंजूर झाले आहे.

लवकरच या उड्डाण पुलाचे कामास सुरुवात होणार असून या उड्डाणपुलामुळे सुकळी गाववासीयांची रेल्वे लाईनचे पलीकडे शेती असून त्या शेतकऱ्यांची शेती वहीवाटीकरीता रेल्वे लाईनकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला. इतकेच नव्हे तर रेल्वे लाईनच्या पलीकडील गावातील शाळकरी मुलं, रुग्ण किंवा इतर तातडीचे कामासाठी ज्यांना शहरात यावे लागत होते त्यांना रेल्वे गेट १-१ तास बंद असल्याने वाट पाहत ताटकळत बसावे लागत असत. हयांचा त्रास गरोदर स्त्रियांना पण खूप झालेला आहे. त्यामुळे या होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्या भागातील गावकऱ्यांनी खासदार अमर काळे यांना निवेदन देऊन आपली व्यथा व्यक्त केली. खासदार अमर काळे यांनी तात्काळ या अडचणींची तात्काळ दखल घेतली व रेल्वे विभागाला पत्र देऊन अधिकाऱ्यांकडे सतत पाठपुरावा केला व रेल्वे विभागाने खासदार अमर काळे यांच्या पाठपुराव्याची तात्काळ दखल घेऊन रु. ३४.८१ कोटीचा उड्डाणपूल मंजूर केला. या भागातील नागरीकांनी त्यांचे अडचणींची तात्काळ दखल घेतल्याबद्दल खासदार अमर काळे यांचे आभार मानले व अमर काळे हे खरोखरच सर्वसामान्यांच्या अडचणीची कुठलाही पक्षपात न करता दखल घेतात व सामान्य जनतेसाठी सतत झटत असतात याचा लोकांना या माध्यमातून आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *