वर्धा जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक

वर्धा : आज स्थानिक वर्धा विश्रामगृह येथे वर्धा जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचे आढावा बैठक घेण्यात आली. सदर बैठकीला वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख माननीय अशोक भाऊ शिंदे मा. राज्यमंत्री उपस्थित होते. सदर आढावा बैठकीत संपूर्ण जिल्ह्यात विधानसभा निहाय बूथ लेव्हल एजंट कसे नेमायचे त्यांची कार्यप्रणाली काय असेल, या संदर्भात तसेच हे वर्ष वंदनीय बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्ष म्हणून संपूर्ण जिल्ह्यात दर महिन्याला सामाजिक उपक्रम सुद्धा या बैठकीमध्ये घेण्याचे ठरवण्यात आले. तसेच संपूर्ण जिल्ह्यात पक्षाचा विस्तार करण्यासाठी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती बाबत देखील आढावा घेण्यात आला.

सदर बैठकीला वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख माननीय अशोक भाऊ शिंदे यांनी मार्गदर्शन केले तसेच या बैठकीला वर्धा जिल्हा प्रमुख राजेंद्र खूप सरे तसेच जिल्हाप्रमुख अनंत भाऊ देशमुख यांनी देखील यथोचित मार्गदर्शन केले. सदर बैठकीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक वर्धा जिल्हा संघटक प्रमोद भो मले यांनी केले, सोबतच नवनियुक्त झालेले वर्धा जिल्हाप्रमुख अनंत भाऊ देशमुख यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. सोबतच आज सदर आढावा बैठकीच्या वेळी रमेश भाऊ दिवटे सामाजिक कार्यकर्ते तसेच आशिष जाचक यांचादेखील पक्षामध्ये प्रवेश वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख अशोक भाऊ शिंदे यांच्या हस्ते घेण्यात आला. सदर कार्यक्रमात दोन्ही जिल्हाप्रमुखांनी पक्ष विस्ताराबाबत सखोल मार्गदर्शन केले तसेच जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी आपापल्या समस्या देखील मांडल्या. लवकरात लवकर संपूर्ण जिल्ह्यात विधानसभा निहाय बूथ लेवल एजंट नियुक्ती केल्या जाईल असा आत्मविश्वास त्यावेळी पदाधिकाऱ्यांनी दाखवला.

सदर बैठकीला उपजिल्हाप्रमुख सतीश भाऊ धो बे, प्रमोद भाऊ भटे, तालुकाप्रमुख अमर बुंदी संजय पांडे, नगरसेवक गुड्डू भाऊ गावंडे, मनीष भाऊ देवडे नगरसेवक तसेच संपूर्ण जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *