पुलगाव-आर्वी रोडवर भीषण अपघात

समृद्धी पुलाखाली दोन दुचाकींच्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू

पुलगाव: पुलगाव-आर्वी मार्गावरील समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली मंगळवारी दुपारी २ अडीच ते तीन दरम्यान दोन मोटारसायकलची समोरासमोर भीषण धडक झाली. या अत्यंत दुर्दैवी आणि काळजाचा थरकाप उडवणाऱ्या अपघातात तीन नागरिकांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालेली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विरूळ समुद्री अंडरपास जवळ एम.एच. ४० बी.यू. २२७४ (एम.एच. ४० बी.यू. २२७४) क्रमांकाची पल्सर गाडी आणि एम.एच. ३२ ए.व्ही. ८४५५ (एम.एच. ३२ ए.व्ही. ८४५५) क्रमांकाची फॅशन (फॅशन प्रो) गाडी यांच्यात समृद्धी पुलाखाली जोरदार धडक झाली. दोन्ही गाड्यांचा वेग जास्त असल्याने हा अपघात अत्यंत भीषण होता. दोन्ही दुचाकींचे यात मोठे नुकसान झाले आहे.

अपघातातील मृतांची नावे:

योगेश रामकृष्ण मेश्राम (रा. साळफळ)

देवेंद्र त्र्यंबक दरनेड (रा. दरने टाकळी)

गंगाधर पंढरीनाथ दरने (रा. दरने टाकळी)

अपघाताची माहिती मिळताच पुलगाव पोलीस स्टेशनचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले. दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक नेमकी कशामुळे झाली, याचा पुढील तपास पुलगाव पोलीस करत आहेत. दोन्ही गावांतील नागरिक या घटनेमुळे शोकासागरात बुडाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *