२५ वर्षे विना अपघात सेवा देणाऱ्या चालकांचा सत्कार

एसटीचा ७८ व्या वर्धापन दिन कार्यक्रम

वर्धा (जिमाका) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात २५ वर्षे विना अपघात सेवा देणाऱ्या दोन चालकांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून यंत्र अभियंता प्रताप राठोड, विभागीय वाहतूक अधिकारी स्वाती तांबे, विभागीय लेखाकार वसंत खिराडे, पत्रकार सुरेंद्र रामटेके, बसस्थानक प्रमुख नंदकिशोर मसराम, विभागीय भांडार अधिक्षक श्री. येवतकर आदी उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते हिंगणघाट आगाराचे वाहन चालक शंकर गिरी व आर्वी आगाराचे वाहन चालक संजय करंदकर यांनी २५ वर्षे विना अपघात सेवा दिल्याबद्दल विना अपघात सेवेचा बिल्ला देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.

सध्या धकाधकीच्या जीवनात रस्त्यावर वाहनाची प्रचंड गर्दी असताना लालपरी आपल्यासाठी कशी सुरक्षित व महत्त्वाची आहे याविषयी माहिती दिली तसेच विना अपघात सेवा देणाऱ्या वाहन चालकांचे कौतुक करून इतर चालकांनी सुद्धा त्यांचे अनुकरण करावे, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वाती तांबे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन संजय नरांजे यांनी केले तर आभार नंदकिशोर मसराम यांनी मानले. कार्यक्रमाला अल्केश वरघणे, प्रशांत बोडखे, शिवा गावंडे, संजय सदर, संजय तळोकार, प्रवीण बद्रे, योगेश गंथाडे, विशाल बडगे, रोहित सांबरे, अर्चना मेंढे, मनिका शर्मा, सुजाता नगराळे, महामंडळाचे कर्मचारी, चालक, वाहक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *