‘माणुसकी अजूनही जिवंत आहे’

वर्धा : शहरातील स्विमिंग पूल परिसरात नाविन्य जुंघरे यांचा मोबाईल हरवला होता. याबाबत त्यांनी सायबर पोलीस स्टेशन, वर्धा येथे मोबाईल हरवल्याची तक्रार दाखल केली होती.

दरम्यान, गांधी नगर, वर्धा येथील श्री. मंगेश सावरकर, श्री. ओम अडेकर व श्री. आयुष निधेकर यांना सदर मोबाईल मिळून आला. त्यांनी प्रामाणिकपणा व सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत त्वरित सायबर पोलीस स्टेशन, वर्धा येथे येऊन मोबाईल जमा केला.

सायबर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पो.नि. श्री. अनिल मेश्राम यांनी तक्रारदार श्री. नाविन्य जुंघरे यांच्याशी संपर्क साधून त्यांचा मोबाईल श्री. मंगेश सावरकर यांच्या हस्ते सुपूर्द केला.

या घटनेतून आजही समाजात प्रामाणिकपणा व माणुसकी जिवंत असल्याचे दिसून येते. श्री. मंगेश सावरकर, श्री. ओम अडेकर व श्री. आयुष निधेकर यांच्या प्रामाणिकपणाचे वर्धा पोलिसांकडून कौतुक करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *