जनावरांचे स्थलांतरण थांबविण्यासाठी कायमस्वरूपी छावण्या लावण्याबाबत प्रयत्न करणार : पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

वर्धा (जिमाका) : वर्धा जिल्ह्यातील काही भागात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाणी आणि चाऱ्याअभावी काही पशुपालक आपल्या पशुंचे स्थलांतरण करीत असल्याचे येथे आल्यानंतर समजले. हे स्थलांतरण थांबविण्यासाठी पशुपालकांच्या गावाशेजारीच पाण्याची उपलब्धता असलेल्या भागात कायमस्वरूपी पाणी आणि चारा उपलब्ध करून देणाऱ्या छावण्या लावण्यासाठी प्रयत्न करू, असे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पशुपालक व शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीला पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतरे यांच्यासह पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, कृषी व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *