वर्धा : येथील राष्ट्रसंत तुकडोजी विचार प्रतिष्ठान मानस मंदिरच्या सार्वजनिक पुतळा पूजन उपक्रमात शहरातील पुतळ्यांचे पूजन संपन्न झाले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ग्रामजयंती सोहळा मानस मंदिरतर्फे महिनाभर साजरा होतो. विविध ठिकाणी भजन, ध्यान, प्रार्थना, प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित होत आहेत. याच काळात वर्धा शहरातील सार्वजनिक पुतळा परिसर स्वच्छता, पूजन व भजन असे कार्यक्रम पुतळा परिसरात होत आहे.
दुसऱ्या टप्प्यात बिरसा मुंडा, जगनाडे महाराज, शास्त्रीजी व अन्य पुतळा परिसरात कार्यक्रम आज संपन्न झाले. हभप पुण्यदासजी चरडे महाराज यांनी भजने सादर केली. या प्रसंगी रवींद्र टप्पे, डॉ. गजानन बोबडे, सतीश जगताप, प्रफुल्ल इंगोले, अजय ठाकरे, प्राचार्य डॉ. रवींद्र हवा, प्रा. केचे, बाळासाहेब धनवटे, पाटसकर, शालिग्राम वानखेडे, प्रल्हादजी गोलाईत, भांडेकरजी, नितीन ठाकरे, पाटसकर व अन्य सहभागी झालेत.