प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे:वर्धा : जिल्ह्यात श्रीराम जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शहरातील विविध भागात भगव्या पताका, तोरण आदी लावण्यात आले. विविध मार्गावर मोठ्या कमानी तयार करण्यात आल्या. श्रीराम नवमीनिमित्त वातावरण राममय झाल्याचे दिसून येत होते. वर्ध्याच्या गोल बाजारस्थित श्रीराम मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या निमित्त मंदिर परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली.
जिल्ह्यात रामजन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. श्रीरामनवमीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शहरात भगव्या पताका, कमानी, झेंड्यांनी सजविण्यात आल्या. जिल्ह्यात श्रीराम मंदिरात भाविकांनी दर्शनाकरिता मोठी रीघ लावली होती. शहरातील गोल बाजार परिसरातील श्रीराम मंदिरात दर्शनाकरिता भाविकांची रांग लागलेली होती. श्रीरामाची गाणी सर्वत्र ऐकू येत होती.
मंदिरात राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. सायंकाळच्या सुमारास शहरातील वेगवेगळ्या भागातून मिरवणूक काढण्यात आल्या. ढोल ताशांच्या गजर, बँड पथक, वाद्य वाजवत मिरवणुकी काढण्यात आल्या. मिरवणुकी दरम्यान वेगवेगळ्या वेशभूषा साकारण्यात आल्या. श्री राम नामाचा जयघोष करण्यात आला. रामनवमीच्या निमित्ताने वातावरण भक्तिमय झाले. जिल्ह्यातील विविध ठिकाणी राममंदिरात रामजन्मोत्सव उत्साहाच्या वातावरणात पार पडला. चौफेर रामनामाचा जयघोष झाला.
शहरातील वेगवेगळ्या मार्गांनी रॅली काढण्यात आल्या होत्या. रॅलीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. रॅलीमध्ये सहभागी तसेच नागरिकांकरिता अनेकांकडून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. अनेक ठिकाणी लंगरचे सुद्धा आयोजन करण्यात आले. मिरवणुकी दरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला. प्रमुख मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली होती.
सायंकाळी श्रीराम शोभायात्रा समितीच्या वतीने गोल बाजार येथील मंदिर परिसरातून विविध देखाव्यांसह शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यातील ढोल-ताशा पथक व विविध देखावे डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरले. दरम्यान मार्गात विविध ठिकाणी सामाजिक संघटनांतर्फे लंगरचेही आयोजन करण्यात आले.