पेन्शनर्स संघटनेने दुष्काळग्रस्तांसाठी एक लाख एक्कावन हजार रुपये निधी केला मंत्र्यांच्या स्वाधीन

प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे,वर्धा : महाराष्ट्रात गत पावसाळ्यात झालेल्या अति पावसाच्या पुराणे शेतजमीन खरडून गेली. पिके वाहून गेली. या प्रसंगी शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी शासनाला आर्थिक सहाय्य करण्याचा वर्धा स्थित ‘केंद्र तथा राज्य शासकीय, निमशासकीय व लोकल बॉडीज वेलफेअर पेन्शनर्स संघटनेने आर्थिक मदत देण्याचा मनोदय व्यक्त केला होता.

त्या अनुषंगाने सर्व सेवानिवृत्तांना सहयोग देण्याचे संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य अरविंद गवरशेट्टीवार आणि पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनाला सर्व सेवानिवृत्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. त्यानुसार गोळा झालेला निधी एक लाख एक्कावन हजार रुपयाचा धनादेश दि. १ जानेवारी रोजी, बॅचलर रोडवरील सभागृहात, माजी पंतप्रधान श्रध्देय अटल बिहारी वाजपेयी स्मृती प्रित्यर्थ घेण्यात आलेल्या समारंभात वर्धेचे पालक मंत्री नामदार पंकज भोयर यांच्या स्वाधीन करण्यात आला.

याप्रसंगी माजी खासदार सुरेश वाघमारे, रामदास तडस, माजी आमदार सुधाकर कोहळे, आदि मान्यवर तर सेवानिवृत्त संघटनेचे सचिव शेषरावजी बिजूवार, कोषाध्यक्ष श्री भोमले सर, व्ही एम देशमुख,, विजय ढोक, वसंत उजवणे, प्रा. रमेश चौधरी, रमेश कोंबे, … थोटे व वर्धा जिल्हा पतंजली फोरमचे योगाचार्य दामोदर राऊत, आदिसह बरेच कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी यांना उपस्थितांनी अभिवादन केले आणि सेवानिवृत्त संघटनेने शासनाला दुष्काळ ग्रस्तांच्या मदतीकरिता दिलेल्या धनरासीबद्दल संघटनेचे अध्यक्ष अरविंद गवरशेट्टीवार, पदाधिकारी व सेवानिवृत्तांचे मंत्री डॉ. पंकज भोयर यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *