होळीच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यात खुनाने खळबळ

प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे,हिंगणघाट : तालुक्यातून गेलेली वना नदी ही रेती माफियांचा मोठा अड्डा बनली असून या नदीच्या माध्यमातून करोडो रुपयांची रेती उचल केली जाते आज याच रेती माफियांमध्ये झालेल्या वादात घाट चालक-मालक भरत नागपाल यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. भरत नागपाल हे पुलगाव नगरपालिकेचे भाजपचे नगरसेवक असून हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यातील सर्व रेती घाट त्यांनी लिलावात घेतले.

यात हिंगणघाट शहरातील एका रेती माफियांकडून भरत नागपाल यांच्यावर दबाव आणण्यात आला या दरम्यान हिंगणघाट तालुक्यातील रेतीचे उत्खनन एका मोठ्या नेत्याच्या माध्यमातून हिंगणघाटच्या रेती माफियाला देण्यात आले असून या रितीच्या उत्खननात झालेल्या वादामध्ये भरत नागपाल यांची आज सायंकाळी सात वाजल्याच्या दरम्यान बांबडा वाळू घाटावर दहाच्या वर असलेल्या गुंडांकडून निर्गुण हत्या करण्यात आली.

या दरम्यान भरत नागपाल यांच्यासोबत असलेल्या अन्य दोघांना देखील गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार भरत नागपाल यांचा शव हिंगणघाट शहरातील उपविभागीय रुग्णालयात आणला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपी संशयितांना ताब्यात घेतले आहे. यात अजून आरोपी वाढण्याची शक्यता आहे. या घटनेने मात्र चांगलीच खळबळ निर्माण झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *