हिंगणघाट नंतर आता आर्वी पोलिस स्टेशनच्या इमारतीचे भूमीपूजन

वर्धा (जिमाका) : राज्याचे गृह राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या पुढाकारामुळे जिल्ह्यातील दोन पोलिस स्टेशनच्या इमारतीला मंजुरी मिळाली आहे. हिंगणघाट पोलिस स्टेशनच्या इमारतीचे नुकतेच भूमीपूजन झाले असून गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी आर्वी पोलिस स्टेशनच्या इमारतीचे भूमीपूजन होणार आहे.

जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या पोलिस स्टेशनच्या इमारती जीर्ण झाल्या होत्या तसेच प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने लहान पडत होत्या. ही बाब लक्षात घेऊन गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी हिंगणघाट व आर्वी पोलिस स्टेशनच्या नवीन इमारतीसाठी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश पोलिस विभागाला दिले होते. त्यानुसार दोन्ही पोलिस स्टेशनच्या इमारतीसाठी गृह विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. सदर प्रस्तावास शासनाने मान्यता देऊन निधीची तरतूद केली आहे.

नुकतेच हिंगणघाट पोलिस स्टेशनच्या इमारतीचे भूमीपूजन पार पडले. गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता गृह राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या शुभहस्ते आर्वी पोलिस स्टेशनच्या इमारतीचे भूमिपूजन होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *