प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे वर्धा : उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि जिल्हा परिषद, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५ दिवसीय ‘जिल्हास्तरीय मिनी सरस प्रदर्शनी व वर्धिनी महोत्सव २०२६’ चा समारोप उत्साहात पार पडला. ग्रामीण भागातील महिलांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्याच्या उद्देशाने आयोजित या महोत्सवात स्वयंसहाय्यता गटांच्या महिलांनी ३४.६५ लाख रुपयांची विक्रमी विक्री करून आर्थिक सक्षमीकरणाचा नवा टप्पा गाठला आहे. ग्रामीण भागातील महिलांच्या कलागुणांना आणि उत्पादनांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी २३ ते २७ जानेवारी २०२६ या कालावधीत स्वावलंबी विद्यालयाच्या मैदानावर या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन २३ जानेवारी रोजी मा. ना. डॉ. पंकज भोयर (राज्यमंत्री तथा पालकमंत्री, जिल्हा वर्धा) यांच्या हस्ते करण्यात आले होते.
प्रदर्शनीमध्ये एकूण १०० स्टॉल्सची व्यवस्था करण्यात आली होती, ज्यामध्ये ८० उत्पादनांचे आणि २२ खाद्यपदार्थांचे स्टॉल्स होते. ५ दिवसांच्या या कालावधीत ग्राहकांनी उत्पादने आणि गावरानी भोजनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विक्रमी विक्री करणारे गट खाद्यपदार्थ (भोजन) यशस्वी गट, देवळी (१,०८,७५०/- रु.) माऊली गट, वर्धा (९६,३००/- रु.) अवधूत मोमोज, वर्धा (८९,५००/- रु.) उत्पादने न्यू एकता, हिंगणघाट (९७,९५०/- रु.) सिद्धेश्वरी श्वेत मसाले, सेलू (९६,२५०/- रु.) सूर्यक्रांती गट, वर्धा (८९,५००/- रु.) या गटांनी क्रमांक प्राप्त केले.
महोत्सवामध्ये महिला आणि मुलांसाठी विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. समूह नृत्य: कलावर्धिनी आर्ट अकादमी (प्रथम), सेंट थॉमस इंग्लिश स्कूल (द्वितीय), एस. टी. अँथनी ५ स्टार (तृतीय). नृत्य स्पर्धा (गट अ): उर्वी सिंगम (प्रथम), चंचल डगवार (द्वितीय), चैताली अनिवाल (तृतीय). फॅशन शो: शिवंल निखिल हिवंज (गट अ), राजकन्या अलोणे (महिला गट), सुलतान पठाण (पुरुष गट) यांनी प्रथम पारितोषिक पटकावले. भव्य समारोप सोहळा २७ जानेवारी २०२६ रोजी महोत्सवाचा समारोप पार पडला.
याप्रसंगी श्री पराग सोमण मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. वर्धा, श्रीमती वैशाली रसाळ प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, वर्धा, अरविंद उपरीकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, श्रीमती नलिनी भोयर प्रकल्प संचालक आत्मा, वर्धा, श्री. नीरज नखाते जिल्हा अभियान व्यवस्थापक, वर्धा मनीष कावडे जिल्हा व्यवस्थापक विपणन, उमेद वर्धा, श्री. सुरज बोबडे, कार्यालयीन अधीक्षक, उमेद वर्धा, श्री. प्रतिक मुनेश्वर जिल्हा व्यवस्थापक, उपजीविका उमेद वर्धा इतर मान्यवर व तालुका अभियान व्यवस्थापक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन मिलिंद झामरे, कल्याणी वानखेडे आणि सरिता इंगोले यांनी केले, तर आभार प्रदर्शन नीरज नखाते यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ‘उमेद’च्या सर्व कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता तालुका अभियान व्यवस्थापक ओमलता दरणे, शुभांगी कोहळे, संदीप कांबळे, हेमंत काकडे, सचिन सावरकर, निशा मेश्राम, तालुक्यातील सर्व कर्मचारी कॅडर यांनी विशेष प्रयत्न केले.