निस्वार्थपणे कार्य करणारे एक प्रभावी नेतृत्व हरवले : राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे वर्धा : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय श्री. अजितदादा पवार यांच्या अचानक झालेल्या अपघाताने समस्त महाराष्ट्राचे मन हेलावून गेले आहे. राज्य आणि समाजासाठी निस्वार्थपणे कार्य करणारे एक प्रभावी नेतृत्व आपणा सर्वांचे अजितदादा आपल्यातून निघून गेले, ही अत्यंत वेदनादायी घटना आहे. त्यांचे राज्याच्या जडणघडणीत मोठे योगदान राहिले आहे.

प्रशासकीय पातळीवर कार्य करण्याची त्यांची हातोटी अतुलनीय होती. त्यांच्या कार्याचा आणि योगदानाचा ठसा सदैव स्मरणात राहील. त्यांच्या विचारांने, कर्तृत्वाने आणि सेवाभावाने पुढील पिढ्यांना सतत प्रेरणा मिळत राहील. ईश्वर आदरणीय अजितदादा यांच्या दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो आणि शोकाकुल परिवारास या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *