जिल्ह्यातील २० ग्रापंना मिळणार सुसज्ज ग्रापं भवन

प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे वर्धा : बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रापं बांधणी योजनेतंर्गत वर्धा जिल्ह्यातील २० ग्रापं भवनासाठी चार कोटी वीस लक्ष रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून आठ ही तालुक्यांतील वीस ग्रापंचे भवन सुसज्ज असे उभे राहणार आहे, अशी माहिती पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यानी दिली.

ग्रापंच्या माध्यमातून गावक-यांना नागरी सुविधा देण्याचे कार्य केल्या जाते. परंतु अनेक ग्रापंच्या इमारती मोडकळीस व प्रशासनिक कामकाज करताना लहान पडत होत्या. सदर ग्रापंच्या इमारती आवश्यकतेनुसार निर्माण करण्याची गरज होती. त्या अनुषंगाने हा निधी देण्यात आला आहे. शासनाने आठ तालुक्यातील २० ग्रापंच्या भवनासाठी ४.२० कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे, असे ही पालकमंत्री डॉ. भोयर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *