वर्धा (जिमाका) : कुष्ठरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कुष्ठरोग हा अधिसूचित आजार घोषित झाला आहे. या रोगाच्या व्यक्तींना शोध घेऊन त्यांना उपचाराखाली आणण्याकरीता आता खाजगी दवाखाने व वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश राहणार आहे. तसेच सामाजिक बांधिलकी असलेल्या सर्व व्यक्तींनी पुढाकार घेऊन यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी केले.
जिल्ह्यात ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी या कालावधीत स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या नियोजनासाठी गठीत करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी आवाहन केले. बैठकीला कुष्ठरोगचे सहाय्यक संचालक डॉ. रा. ज. पराडकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या पवार व इतर अधिकारी उपस्थित होते.