बजाज चौकातील आकर्षणाचे केंद्र असणारे पाण्याचे फवारे दुर्लक्षित

पाण्याच्या फवाऱ्यांची तातडीने देखभाल करण्यात यावी. ए.आय.एम.आय.एम.ची आग्रही मागणी
प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे

वर्धा : शहराच्या बजाज चौकात नागरिकांच्या आकर्षणासाठी लावण्यात आलेल्या पाण्याच्या फवाऱ्यांची गेल्या अनेक दिवसांपासून योग्य देखभाल व दुरुस्ती झाली नसल्याने फवाऱ्यांमधून येणाऱ्या रंगीबेरंगी पाण्याच्या धारा सरळ न येता आडव्या-तिडव्या दिशेने जात आहेत. त्यामुळे फवाऱ्यांची सुंदरता नष्ट होत असून शहराच्या सौंदर्यावरही याचा परिणाम होत आहे. तसेच काही ठिकाणी फवारे पूर्णपणे बंद अवस्थेत असल्याचेही पाहायला मिळत असून नागरिकांमध्ये ही नाराजी चे वातावरण आहे दिसून येत आहे.

संध्याकाळ च्या वेळी या फवाऱ्यांजवळ नागरिक, लहान मुले आणि कुटुंबे मोठ्या प्रमाणात वेळ घालवण्यासाठी येतात. मात्र फवाऱ्यांची दुरवस्था झाल्यामुळे त्यांचा आनंद कमी झाला आहे. शहराच्या सौंदर्यिकरणासाठी लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या सुविधांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर ही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

फवाऱ्यांची नियमित देखभाल न झाल्यामुळे नागरिकांमध्येही नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित प्रशासनाने या फवाऱ्यांची तात्काळ पाहणी करून आवश्यक दुरुस्ती व देखभाल लवकरात लवकर करावी, अशी आग्रही मागणी ए.आय.एम.आय.एम.च्या वतीने करण्यात आली आहे.

शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या या फवाऱ्यांची योग्य देखभाल करून ते व्यवस्थित सुरु ठेवावेत, तसेच भविष्यात नियमितwebElementXpathsकडे नगर परिषद प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी ही करण्यात आली आहे. तसेच या कामासाठी स्वतंत्र देखभाल पथक नेमून वेळोवेळी तपासणी करण्यात यावी, अशी अपेक्षाही करण्यात आली आहे.

चौकाच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या या पाण्याच्या फवाऱ्यांबाबतच्या देखभालच्या मागणीकडे दुर्लक्ष न करता मागण्यांची पूर्तता करावी. अन्यथा लक्षवेधी आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा ए.आय.एम.आय.एम. जिल्हाध्यक्ष आसिफ खान यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *