प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारेवर्धा : वर्धा जिल्ह्यातील अनेक गरीब व गरजू रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजना तसेच आयुष्मान भारत योजनेअंतर्गत उपचाराचा लाभ मिळतो. मात्र या योजनांमध्ये अनेक गंभीर आजारांचे व महागडे ऑपरेशन समाविष्ट नसल्याने रुग्णांच्या कुटुंबांवर मोठे आर्थिक संकट ओढावते आहे.
हृदयविकार, मेंदूविकार, किडनी, कॅन्सर यांसारख्या गंभीर आजारांवरील ऑपरेशनसाठी 4 ते 5 लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. अशा परिस्थितीत गरीब रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून सध्या मिळणारी मदत अत्यंत अपुरी ठरत आहे. अनेक वेळा निधी मर्यादेमुळे रुग्णांचे प्राण धोक्यात येत असल्याचे चित्र आहे.या पार्श्वभूमीवर महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेत न बसणाऱ्या ऑपरेशनसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून किमान $5$ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.