मंदिराची दानपेटी व घंटी चोरी करणाऱ्या टोळीला अटक

हिंगणघाट : शहरातील विविध प्रभागातील सार्वजनिक मंदिरातून दानपेटी व मंदिरातील घंटी चोरी करणाऱ्या टोळीचा छडा येथील पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने लावला. पोलिसांनी ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी पोलिसांनी शेख सकलेन शेख जाकीर (वय २०, रा. हनुमान वॉर्ड), मंथन गणेश जुमडे (वय १९, रा. डांगरी वॉर्ड) व एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे. त्यांनी भवानी माता मंदिरातील दानपेटी व घंटी संगणमत करून चोरून नेल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून चोरीला गेलेली स्टीलची दान पेटी, पितळेची घंटी, पेटीतले ५००० रोख रुपये असा ३३ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. तिन्ही आरोपींची सखोल विचारपूस केली असता या आरोपींनी शहरात वेगवेगळ्या मंदिरात चोरी केलेल्या सात घंटी, एक तार बंडल, फोर व्हीलर गाडीच्या बॅटरी, पाण्याची मोटर व चोरी करण्यात वापरलेले केले.

या चोरी केल्याचे त्यांनी साहित्य त्यांच्याकडून जप्त कबूल केले. पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, डी वाय एस पी सुशील नायक यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अनिल राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता हेलोंडे, गुन्हे शाखेचे पोलीस जमादार प्रवीण बावणे, पोलीस नायक नरेंद्र आरेकर, निलेशसिंग सूर्यवंशी, संतोष गीते, सागर सांगोळे यांनी तपास करून वरील गुन्हे उघडकीस आणले. सदर दोन्ही आरोपींचा पीसीआर घेण्यात आला असून या संदर्भात पुढील तपास पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *