पाठलाग करून वाहन, दारूसाठ्यासह १० लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे वर्धा : पोलिसांनी पाठलाग करून वाहन, दारूसाठ्यासह दहा लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शहर पोलिसांनी केली. पोलीस जिप चालकाच्या सतर्कतेने ही कारवाई करत मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस गस्त करत असताना सिद्धार्थ नगर मार्गाने चारचाकी वाहन जात होते. पोलिसांचे वाहन पाहून संबंधित वाहन भरधाव वेगाने जात असल्याने संशयावरून पोलीस वाहनाचे चालक आकाश कुंभरे यांच्या सतर्कतेने वाहनाचा पाठलाग करत एम.एच.४६ डब्ल्यू १८४६ क्रमांकाचे वाहन सिद्धार्थ नगर, चितोडा रोडवर थांबवून ताब्यात घेण्यात आले.

वाहन चालकाने मिथुन गोपालराव येळकर (वय ३८) रा. गणेश नगर, बोरगाव (मेघे) वर्धा असे नाव सांगितले. तपासणी केली असता वाहनातून देशी विदेशी कंपनीचा दारूसाठा जप्त करण्यात आला. पोलिसांनी १० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संतोष ताले, पोलीस अंमलदार सुहास चांदोरे, पंकज भरणे, लोभेश गाडवे, सचिन भालशंकर, नवनीत वानखेडे, मनोज काकतपुरे, आकाश कुंभरे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *