वर्धा : अग्निहोत्री इन्स्टिट्यूशन्स यांच्या वतीने आयोजित वर्धा प्रीमियर लीग २०२५ चा अंतिम दिवस प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात आणि जल्लोषात पार पडला. अंतिम सामन्यात नॅचरल सोलर चार्जेस आणि प्रिशा किंग्स ११ यांच्यात रंगतदार लढत पाहायला मिळाली. सुपर ओव्हरपर्यंत गेलेल्या या सामन्यामुळे मैदानात थराराचे वातावरण निर्माण झाले.
अंतिम सामन्यात पंकज दखने याने अवघ्या २५ चेंडूंमध्ये ६३ धावांची झुंजार खेळी केली, तर अभिजीत चौधरी याने २१ चेंडूंमध्ये ४१ धावा करत संघाला बळ दिले. अखेर नॅचरल सोलर चार्जेस यांनी उत्कृष्ट सांघिक कामगिरीच्या जोरावर विजेतेपद पटकावले. विजेत्या संघाला १.५ लाख रुपये व ट्रॉफी, तर प्रिशा किंग्स ११ (उपविजेते) संघाला १ लाख रुपये व ट्रॉफी प्रदान करण्यात आली.
स्पर्धेतील वैयक्तिक पुरस्कार:
मॅन ऑफ द सिरीज: श्रेयस तेलरांधे
उत्कृष्ट फलंदाज: निखिल कवाडे
उत्कृष्ट गोलंदाज: गौंरग ढगे
उत्कृष्ट खेळाडू: प्रेम सिंग
उत्कृष्ट क्षेत्ररक्षक: जॅक्सन क्रूस
मॅन ऑफ द मॅच: सुबोध ठाकरे
बक्षीस वितरण समारंभात सचिन अग्निहोत्री यांनी खेळाडूंना मार्गदर्शन व प्रोत्साहन देत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास पंडित शंकरप्रसाद अग्निहोत्री, नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, वैभव काशीकर, विरू पांडे, नवनियुक्त नगरसेविका पांडे, प्रदीप बजाज, आयुष सिंघानिया यांची प्रमुख उपस्थिती होती.
यशस्वी आयोजनासाठी समिती सदस्य महेश झाटे, प्रतीक राऊत, सौरभ इंगोले, निखिल चौधरी, निलेश नाले, वैभव कवाडे, राजेश पवार, शिवम काळे, भरत पाटील, गोलू कोकाटे, गोलू इंगोले, सागर फाटे, अमित थूल, लोकेश नरुले, आशिष केचे, अतुल पाळेकर, अनिकेत देवगिरीकर, अजय पहाडे यांनी परिश्रम घेतले.