(अजीज शेख) प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे वर्धा : वर्धा जिल्हा हा गांधी जिल्हा म्हणून देश विदेशात प्रसिद्ध होता. परंतु या गांधी जिल्ह्यात आता भाजपाने वर्चस्व स्थापन केले आहे. वर्धा जिल्ह्यात भाजपाची सत्ता होती. आता जिल्ह्यातील सर्व नगर परिषदेच्या निवडणुका राजकीय नेते पुढार्यांसाठी अस्तित्वाची लढाई झाली असून भाजपाचे मित्र पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट, अजित पवार गट, आणि भाजपा वेगवेगळे लढत असल्याने चित्र बदलत आहे. वर्धा येथे काँग्रेसचे उमेदवार सुधीर पांगुळ, भाजपाचे उमेदवार निलेश किटे, शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रविकांत भोमले हे प्रमुख उमेदवार उभे मारणार याकडे सर्वांचे लक्ष बापपांडे, आमचे उमेदवार प्रमोद असल्याने जिल्हयात कोण बाजी लागले आहे.
भाजपासाठी वर्धेत प्रतिष्ठेची निवडणूक
वर्धा नगर परिषदेसाठी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांचे निकटवर्ती निलेश किटे यांना शेवटच्या क्षणी उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यांच्या विजयासाठी पालकमंत्री अहोरात्र कामाला लागले आहे. परंतु लाडक्या बहिणींसमोर संभ्रम निर्माण झाला आहे. लाडकी बहिणीचे तीनभाऊ मत कोणाला देऊ, या विवंचनेत लाडकी बहिण अडकली आहे. मुख्यमंत्री असतांना एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिण योजना लागू केली. आता अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार आहे. आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस कार्यरत आहे. अशात तीनही पक्ष वेग वेगळ्या चिन्हावर जिल्हयात निवडणूक लढवित आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनी मतदान कोणाला करायचे, यावर संभ्रम निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रविकांत बालपांडे हे जिल्हयात अनेक वर्षांपासून कार्यरत असून त्यांचे कार्य, त्यांची ओळख धनुष्यबाण म्हणून आहे. त्यांच्या उमेदवारीने भाजपाचे समिकरण बिघडणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले असले तरी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा प्रयत्न भाजपा उमेदवार विजयी करण्यासाठी ते सर्वत्र प्रयत्न करीत आहे.
देवळी येथे माजी भाजपाचे माजी खासदार रामदास तडस यांच्या पत्नी शोभा तडस यांना उमेदवारी दिल्याने नाराजीवर्धा जिल्ह्यातील देवळी, हिंगणघाट येथे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आपला उमेदवार विजयी व्हावा, यासाठी भाजपा सर्व स्तरांतून प्रयत्न करीत असतांना देवळी येथे वंशवादाचा उदय झाला, देवळी नगराध्यक्ष म्हणून कार्य केलेल्या माजी खासदार रामदास तडस यांच्या पत्नींना पुन्हा आता उमेदवारी दिल्याने अनेक कार्यकर्त्यांसह देवळीकर नाराज झाले आहे. तर हिंगणघाट येथे भाजपाची गंभीर अवस्था पाहून चक्क नगराध्यक्षाच्या निवडणुकीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी येत आहे. उद्या हिंगणघाट येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहिर सभा होत आहे. वर्धा जिल्ह्यात नगर परिषदेच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांची एंट्री चर्चेचा विषय ठरत आहे.