वर्धा: नगर परिषदेत मालमत्ता विभाग गायब झाल्याची बाब निदर्शनास येत असून गायब आलेल्या गाळ्यावर प्रभाग क्रमांक नऊचे उमेदवार व माजी नगरपरिषद उपाध्यक्ष प्रदीपसिंग ठाकूर व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी बेकायदेशीर रित्या कब्जा करून ठेवल्याचे दिसून येते आहे. यात प्रदीपसिंग ठाकूर, दिलीपसिंग ठाकूर, विजयसिंग ठाकूर, किशोरसिंग ठाकूर व ठाकूर यांचे कर्मचारी मंगेश आतुकुसकर यांचा समावेश आहे. १९ पैकी १८ व ३२ क्रमांकाचे गाळे प्रदीपसिंग ठाकूर यांच्याकडे आहे.
२० क्रमांकाचा गाळा शक्ती एजन्सी च्या नावे असून त्या एजन्सीशी आपला संबंध नसल्याचे प्रदीपसिंग ठाकूर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना २१/११/२०११ रोजी कळविले होते. मात्र त्याचाही आपला संबंध नाही असे ठाकूर म्हणतात तोच १८ क्रमांकाचा गाळा करारानामा व त्याचे ताबापत्र घेण्यासाठी प्रत्यक्ष प्रदीपसिंग ठाकूर यांनी पालिकेकेडे २७/१०/२०१६ रोजी अर्ज केला. त्याचा अर्थ तो गाळाही त्यांनी आपल्याकडे ठेवल्याचे दिसून येते. २०१५ च्या निवडणुकांमध्ये महेश तेलरांधे यांनी संदर्भत आक्षेप नोंदवल्यावर प्रदीपसिंग ठाकूर यांनी २००४-२००५ ते २०१४-२०१५ पावती शक्ती एजन्सी तर्फे भाडे भरणा केल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांच्या आक्षेप आदेशाच्या उत्तरांमध्ये नमूद केलेले आहे.
विशेष बाब म्हणजे प्रदीपसिंग ठाकूर यांचा करारनामा झाला नसल्याने मिळकत विभागातून डिमांड रजिस्टर ला याची नोंद घेण्यात आली नाही. मात्र त्यांना अनावधानाने ना हरकत प्रमाणपत्र दिल्याचे पालिकेकडून सांगितले. पालिकेची ही करामत प्रदीपसिंग ठाकूर यांच्या दहशतीमुळे सहकार्य करणारी असल्याचं स्पष्ट आहे. २०१० च्या माहिती अधिकारातील माहितीत जिल्हाधिकारी वर्धा यांना उपविभागीय अधिकाऱ्यांनी सांगितले. गाळा क्रमांक ११, १२, १३ व १४ हे गाळे श्री दिलीपसिंग ठाकूर यांच्याकडे ठेवली आहेत. ११ व १२ हे गाळे प्रदीपसिंग ठाकूर यांच्या नावाने आहेत. याचा अर्थ ते अनाधिकृत पणे गाळे ताब्यात घेऊन आहेत. असा आरोप आज काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते महेश तेलरांधे यांनी केला. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर, किसान अधिकार अभियानाचे प्रेरक अविनाश काकडे, युवा नेता सुधीर पांगुळ उपस्थित होते. हे प्रकरणी लवकरच पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करून न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती देण्यात आली.