वर्धा (जिमाका) : देशात विज्ञान व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रामोद्योग सशक्त करण्यासाठी तसेच ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीस चालना देण्याच्या दृष्टीने महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्था वर्धा ही महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. महात्मा गांधीजींच्या ग्रामोद्योगावर आधारित सशक्त भारत निर्मितीच्या संकल्पनेला एमजीिरी साकार करत आहे. देशभरातील हजारो कारागीर, महिला, शेतकरी, युवक, खादी संस्था व गोशाळा एमजीिरीद्वारे विकसित करण्यात आलेल्या तंत्रज्ञानाचा लाभ घेत आहेत, असे केंद्रीय राज्यमंत्री शोभा करंदलाजे एमजीिरी, वर्धा येथे आयोजित कार्यक्रमात म्हणाल्या.
सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय, भारत सरकार यांच्या केंद्रीय राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्था (एमजीिरी), वर्धा येथे राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचा तसेच नवीन प्रकल्पांचा आढावा घेतला. केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या आढावा बैठकीस एमएसएमई मंत्रालयाचे संयुक्त सचिव विपुल गोयल, संचालक (एआरआय) अशोक शर्मा, जिल्हाधिकारी वान्न्मथी सी., मुख्याधिकारी विजय देशमुख, इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र, नवी दिल्ली, एनबीसीीएचे वरिष्ठ अधिकारी तसेच एमजीिरीचे संचालक डॉ. आशुतोष मुरकुटे प्रमुख उपस्थित होते.