वर्धा : जिल्हयातील नगर परिषदसाठी आज २ डिसेंबरला जिल्हयात मतदान होत असून ३ डिसेंबरला मतगणना होणार होती. परंतु नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार ११ डिसेंबरला होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार नगर परिषद अध्यक्षपदासाठी देवळी येथील निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली. देवळी नगर पालिकेच्या अध्यक्षपदाबाबत याचिका दाखल करण्यात आली होती.
देवळीच्या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर आणि वर्धा नगर पालिकेतील प्रभाग ११ ब, अ, प्रभाग १ ब, हिंगणघाट येथील प्रभाग ५ अ, ब, व १ अ तसेच पुलगाव नगर पालिकेतील ५ अ व २ अ या प्रभागातील निवडणुकीला आव्हान देण्यात आले होते. त्यावर नागपूर खंडपीठाने निर्णय दिला असून मतमोजणी आता ११ डिसेंबरला होणार आहे.जिल्ह्यात उर्वरित ठिकाणी आज शांततेत मतदान चालू आहे.