बहारचे अध्यक्ष डॉ. बाबाजी थेंबडे यांनी स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांची माहिती सादर केली. उपाध्यक्ष संजय इंगळे तिगावाकर, संस्थापक अध्यक्ष प्रा. किशोर वानखेडे, सहसचिव देवर्षी बोबडे यांनी विद्यार्थ्यांना पक्ष्यांचे महत्त्व, संवर्धन आणि निसर्ग संरक्षणबाबत संवाद साधला. संचालन स्नेहल कुबडे, आभार प्रदर्शन मुख्याध्यापक दीपक गुढेकर यांनी केले. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना सुसुंद तलाव परिसरात पक्षिनिरीक्षण करून सुमारे ४५ पक्षी प्रजाती दाखविण्यात आल्या.
खंड्या, पाणबगळे, दयाळ, बुलबुल, कोतवाल आदी पक्ष्यांची ओळख, नोंदी घेण्याची पद्धत आणि दुर्बणीचा वापर समजावून सांगण्यात आला. गावातील नागरिकांनीही सहभाग नोंदवला. यावेळी बहारचे पदाधिकारी व सदस्य तसेच निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याच उपक्रमाचा दुसरा भाग राहाटी येथील उच्च प्राथमिक शाळेत घेण्यात आला, कर्मचारी आणि शाळेचे शिक्षक ज्यात वन विभागाचे अधिकारी, सहभागी झाले.